समांथाने ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर!


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : फॅमिली मॅन फेम अॅक्ट्रेस समांथा आणि अभिनेता नाग चैतन्य यांनी आपले 4 वर्षांचे लग्न संपवण्याचा निर्णय घेतला आहे. 2 ऑक्टोबर रोजी त्यांनी अशी ऑफिशियल घोषणादेखील केली हाेती. त्यानंतर ‘फक्त’ समांथाला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. बऱ्याच अफवांनी देखील या काळात जोर धरला होता.

Samantha gives unequivocal answer to trolls!

200 करोड रुपये तिने आपल्या सासरच्या लोकांकडून मागितले आहेत. अशा देखील अफवेने जोर धरला होता. पण नुकताच एले मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने या सर्व गोष्टींना फुलस्टॉप देणारे उत्तर दिले आहे. ती म्हणते की, मी नागा कडून अजिबात पैसे मागितलेले नाहीत. मला त्यांच्याकडून एक रुपयादेखील नको आहे.

असे सडेतोड उत्तर देताना ती पूढे म्हणते, मी असं म्हणत नाहीये की, तुम्ही माझा निर्णय आणि मला मी जशी आहे तशी स्वीकारा. तुम्हाला ट्रोल करायचं आहे तर करा. पण थोड्याशा सिव्हिलाईजड पध्दतीने तुम्ही ट्रोल करा. असे तिने म्हटले आहे.


समांथा झळकणार ‘द अरेंजमेंट ऑफ लव्ह’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात


समांथा आणि नागा यांनी वेगळे होण्याचा निर्णय चाहत्यांना सांगितल्या नंतर समांथाचे अबॉशन झाले, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर अशा बऱ्याच अफवांनी जोर धरला होता. नुकताच समानता आपल्या करिअर मधील सर्वात मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसून येणार आहे. नेटफ्लिक्सवरील डाऊनटाऊन अॅबे फेम फिनिक्स जॉन या डिरेक्टर सोबत ती काम करताना दिसून येणार आहे. तर नागाचा नुकताच साई पल्लवी सोबतचा लव्ह स्टोरी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.

Samantha gives unequivocal answer to trolls!

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण