महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट काढणार; पालकमंत्री भुजबळ यांची घोषणा, एकाच वेळी ५० ग्रंथांचेही प्रकाशन


प्रतिनिधी

कुसुमाग्रजनगरी, नाशिकः महाराज सयाजीराव गायकवाड यांच्यावर चित्रपट, नाटक काढणार आहे, अशी घोषणा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली. महाराजा सयाजीरावांनी महात्मा फुले, डॉ. बाबसाहेब आंबेडकर अशा अनेक युगपुरुषांना मदत केली. माणसांमधील कर्तृत्व ओळखून त्यांना संधी देणारे हे राजे होते. Maharashtra To make films and plays on Maharaja Sayajirao Gaikwad; Guardian Minister chagan Bhujbal’s announcement, simultaneous publication of 50 books

त्यांचे चरित्र जगासमोर येणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यावेळी महाराजांवरील 50 पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात आले. त्यात महाराज सयाजीराव लेखन आणि सुप्रशासन 11 ग्रंथ, सयाजीरावांसबंधी स्वंतत्र लेखन व जगप्रवास 16 ग्रंथ, मराठी, इंग्रजी चरित्र ग्रंथ शिक्षण अहवाल, स्त्री शिक्षण 13 ग्रंथ, हिंदी ग्रंथ प्रकाशन भाषण, पत्र संग्रह, गौरवगाथ 10 ग्रंथांचा समावेश आहे.

कार्यक्रमाला महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोद्याच्या कुलपती राजमाता शुभांगीनींराजे गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष उदय सामंत, समितीचे सदस्य सचिव बाबा भांड, पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे समन्वयक प्रा. हरी नरके, उच्च तंत्र शिक्षण विभागाचे संचालक डॉ. धनराज माने, विश्वास ठाकूर उपस्थित होते.कार्यक्रमात पालकमंत्री भुजबळ म्हणाले की, आज महाराज सयाजीराव गायकवाडांच्या पन्नास पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे, ही अतिशय आनंदाची व अभिमानाची बा‍ब आहे. समितीने 50 पुस्तकांचे प्रकाशन करुन षटकार मारला आहे. तसेच महाराज सयाजीराव गायकवाडांचे जन्मस्थळ नाशिक असून, आज त्यांच्या पुस्तकांचे प्रकाशन जन्मभूमीत व मराठी साहित्य संमेलनात होत असल्याने आजचा दिवस भाग्याचा असल्याचे सांगत भुजबळ यांनी आनंद व्यक्त केला. महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फुलेंना ‘महात्मा’ ही पदवी बहाल करुन महात्मा फुलेंचे सर्व विचार राज्यकर्ता म्हणून अमलांत आणणारे पहिले राजे होते, असेही भुजबळ यांनी सांगितले.

महाराज सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समितीच्यावतीने महाराजा सयाजीराव गायकवाडांचे संपूर्ण साहित्य संपदा लोकांसमोर आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे, अशी ग्वाही यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत या कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणारे महाराजा सयाजीराव गायकवाड हे पहिले राजे होते. ।

महाराजांचे कार्य दिशादर्शक

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजमाता शुभांगींनीराजे म्हणाल्या, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभार चालविताना समाजातील सर्व घटकांचा विचार केला. त्यामुळे महाराजांचे कार्य आजही समाजातील सर्व घटकांना दिशादर्शक आहे. तसेच आज महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या जन्मभूमीत त्यांच्या 50 पुस्तकांचे प्रकाशन होत आहे असल्याने अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. महाराजा सयाजीराव गायकवाड यांची साहित्य संपदा व कार्य राज्य शासनामार्फत लोकांसमोर नेण्यासाठी प्रयत्न केला जात असून, अशाप्रकारे महाराजा सयाजीराव गायकवाडांची राष्ट्रीय पातळीवर ओळख होण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही राजमाता शुभांगींनीराजे यांनी व्यक्त केली.

Maharashtra To make films and plays on Maharaja Sayajirao Gaikwad; Guardian Minister chagan Bhujbal’s announcement, simultaneous publication of 50 books

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात