समांथा झळकणार ‘द अरेंजमेंट ऑफ लव्ह’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात


विशेष प्रतिनिधी

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री समांथा सध्या बऱ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. नुकताच ती चर्चेत आली आहे ती म्हणजे तिच्या नव्या इंटरनॅशनल प्रोजेक्टमुळे. नेटफ्लिक्सवरील ‘डाऊनटाऊन एबी’ या प्रसिध्द सीरिजचे दिग्दर्शक फिलिप जॉन यांच्यासोबत समांथा काम करताना दिसून येणार आहे. नुकताच तिने या इंटरनेटच्या प्रोजेक्टसाठी ऑडिशन दिली आणि ती त्याच्यामध्ये सिलेक्ट देखील झाली.

Samantha will be seen in the international film ‘The Arrangement of Love’

‘द अरेंजमेंट ऑफ लव्ह’ या आंतरराष्ट्रीय चित्रपटात ती झळकणार आहे. या चित्रपटात ती बायसेक्युअल पात्र निभावणार आहे. याबद्दलची बातमी खुद्द समंथाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांना दिली आहे. ती लिहिते की, 2009 मध्ये मी सर्वात पहिली ऑडिशन दिली होती. त्यानंतर तब्बल 12 वर्षांनी मी ऑडिशन दिली. 2009 मध्ये ऑडिशन देताना जी भावना होती, जो नर्व्हसनेस होता तोच ह्यावेळी देखील जाणवला. आयुष्याच्या नव्या चॅप्टरची आता सुरुवात होत आहे.


घटस्फोटासाठी नेहमी स्त्रीला का जबाबदार धरले जाते? समंथाने आपली संतप्त प्रतिक्रिया केली व्यक्त


इतक्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये काम करण्याची संधी दिली म्हणून तिने या पोस्ट मध्ये फिलिप जॉन यांचे आभार देखील मानले आहेत. या चित्रपटाची निर्माती आहे सुनीता ताती. सुनिता यांनी ओ बेबी या चित्रपटामध्ये समांथासोबत काम केले होते. सध्या समांथा अल्लू अर्जुनच्या पुष्पा चित्रपटातील गाण्यांच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. तिच्या आगामी इंटरनॅशनल प्रोजेक्टचे चित्रीकरण ऑगस्ट 2022 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

Samantha will be seen in the international film ‘The Arrangement of Love’

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण