सुप्रिम कोर्ट आदेश पाळत परमबीर सिंहांचे चौकशीत सहकार्य; साडेसहा तास चौकशीत सर्व आरोप फेटाळले!


प्रतिनिधी

मुंबई : न्यायालयाने फरार घोषित केल्यानंतर मुंबईचे माजी आयुक्त परमबीर सिंह गुरुवारी सकाळी कांदिवलीच्या गुन्हे शाखेच्या युनिटमध्ये हजर झाले. त्यांची जवळजवळ साडेसहा तास चौकशी करण्यात आली. गुन्हे शाखेची चौकशी पूर्ण झाली आहे आणि परमबीर सिंहांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. आपण सुप्रिम कोर्ट आदेश पाळत चौकशीत सहकार्य करत आहोत, असे त्यांनी सांगितले आहे. Parambir Singh’s co-operation in complying with Supreme Court order

परमबीर सिंह यांच्यावर मुंबई आणि ठाण्यात खंडणी आणि जातीवाचक शिवीगाळ तसेच इतर अनेक आरोपांखाली गुन्हे दाखल आहेत. सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना खंडणी आरोप प्रकरणात अटकेपासून संरक्षण दिले. त्याचवेळी न्यायलयाने त्यांना तपासात सहभागी होण्याचेही आदेश दिले.


परमबीर सिंह यांना न्यायालयाने फरार घोषित केले होते. पाच वेगवेगळ्या खंडणी प्रकरणात आरोपी असलेले परमबीर सिंह यांना फरार घोषित करा, असा अर्ज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने दाखल केला होता. त्यावर मुख्य दंडाधिकारी न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. परमबीर सिंह यांना फरार घोषित केल्यानंतर आता त्यांना 30 दिवसांची मुदत दिली गेली होती. या 30 दिवसांत परमबीर सिंह जर न्यायालयासमोर हजर झाले नाहीत, तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा अधिकार राज्य सरकारला मिळणार होता. पण आता परमबीर सिंह परतल्यामुळया प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

Parambir Singh’s co-operation in complying with Supreme Court order

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात