भाजप – काँग्रेस यांचे ठरल्यानुसार विधान परिषद निवडणूक बिनविरोध


प्रतिनिधी

मुंबई : मुंबई महापालिकेतून विधान परिषदेत दोन सदस्यांच्या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सुनील शिंदे आणि भाजपकडून राजहंस सिंह यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनीही काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरत चुरस निर्माण केली होती. पण, सुरेश कोपरकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मुंबईतील विधान परिषदेच्या दोन जागा आता बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.BJP-Congress Legislative Council elections unopposed as decided

अर्थात या आधीच भाजप तसेच काँग्रेस नेत्यांचे ठरल्यानुसार ही निवडणुक बिनविरोध होत आहे. काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर भाजपने माघार घेतली होती. त्या बदली काँग्रेसने माघार घेतली आहे. देवेंद्र फडणवीस तसेच नाना पटोले यांची चर्चा झाली होती.


विधान परिषदेसाठी शिवसेनेत अंतर्गत स्पर्धा; सचिन अहिर, वरुण सरदेसाई, सुनील शिंदे की किशोरी पेडणेकर?


अपक्ष उमेदवार सुरेश कोपरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे भाजपचे राजहंस सिंग तर, शिवसेनेचे सुनील शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजपने एका अमराठी उमेदवाराला उमेदवारी दिली. दुसरीकडे सुनिल शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासाठी विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघ सोडला होता आणि त्यांना विधान परिषदेची आमदारकी दिली जाईल, असे आश्वासन देण्याच आले होते. अखेर सेनेकडून सुनील शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली.

खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने माघार घेत ही निवडणूक बिनविरोध केली होती. तसेच सातव यांच्या पत्नीचीही विधान परिषदेवर बिनविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे काँग्रेसने दबावतंत्र राबवण्यासाठी आपल्या उमेदवाराला अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उभे केले होते. त्यामुळेच कोपरकरांनी अपेक्षेप्रमाणे अर्ज मागे घेतला आहे.

BJP-Congress Legislative Council elections unopposed as decided

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात