WATCH : पुणे जिल्ह्यातील पतसंस्थेवर सशस्त्र दरोड्याने धास्ती गोळीबारात व्यवस्थापकाच्या मृत्यूने उडाली खळबळ


विशेष प्रतिनिधी

पुणे : नारायणगाव तालुका जुन्नर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर टाकलेल्या सशस्त्र दरोड्यावेळी झालेल्या गोळीबारात व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा मृत्यू झाला आहे.बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हा दरोडा टाकण्यात आला.Armed robbery at a patsanstha in Pune district; Sensation over the death of a manager in a shooting

मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी १४ नंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा टाकला. या दरोड्यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय – ५२) यांना गोळी लागून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.पुणे जिल्ह्यातील नारायणगाव तालुका जुत्रर येथील अनंत नागरी बिगर शेती पतसंस्था १४ नंबर येथे दोन अज्ञात चोरट्यांनी पतसंस्थेत घुसून पैशाची मागणी करत दरोडा टाकला. पैसे देण्यास विरोध करणाऱ्या व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांच्यावर चोरट्यांनी गोळीबार केला. या घटनेने नारायणगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • पुणे जिल्ह्यातील पतसंस्थेवर सशस्त्र दरोड्याने धास्ती
  •  जुन्नरच्या अनंत ग्रामीण पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा
  • अज्ञात चोरट्यांची पतसंस्थेत घुसून पैशाची मागणी
  • पैसे देण्यास विरोध करणाऱ्या व्यवस्थापकावर हल्ला
  •  व्यवस्थापकाचा गोळी लागल्याने मृत्यू
  •  नारायणगाव परिसरात खळबळ उडाली

Armed robbery at a patsanstha in Pune district; Sensation over the death of a manager in a shooting

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात