Nitin Gadkari ! नाशिक-पुणे महामार्गाबाबत नितीन गडकरींची मोठी घोषणा


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नाशिक-पुणे महामार्गाबाबत मोठी घोषणा केली आहे. गेल्या दोन दशकांपासून नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाची चर्चा होत आहे. Nitin Gadkari! Nitin Gadkari’s big announcement about Nashik-Pune highway

हा महामार्ग काही प्रमाणात पूर्ण झाला असला तरी काही भागात अद्यापही मोठे अडथळे आहेत. त्यामुळे संपूर्ण रुंदकरण न झाल्याने नाशिक-पुणे अंतर हे अधिकच असल्याचे दिसून येते. परिणामी, वाहनचालकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते.

नाशिक-पुणे महामार्गाचे काम हे विविध टप्प्यांमध्ये केले जात आहे. त्यात नाशिक ते सिन्नर, सिन्नर ते संगमनेर, संगमनेर ते खेड, खेड ते पुणे या टप्प्यांचा समावेश आहे. संगमनेर आणि सिन्नर या दोन्ही शहरांलगत बायपास विकसीत करण्यात आला. तो सध्या वाहतुकीसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळत आहे. मात्र, अद्यापही आळे फाटा, नारायण गाव आणि खेड याठिकाणी महामार्गाचे रुंदीकरण होऊ शकलेले नाही.

भूसंपादनाच्या अडचणीसह महामार्गाचा मंजूर नकाशा याबाबत अनेक प्रश्न आणि समस्या होत्या. यासंदर्भात लोकप्रतिनिधींनीही वेळोवेळी वविध मागण्या केल्या.त्यानुसार, नाशिक फाटा ते खेड या दरम्यानच्या महामार्गाच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.तशी माहिती गडकरी यांनी दिली आहे. आता प्रत्यक्ष महामार्गाच्या कामाला चालना मिळणार आहे. येत्या दीड ते दोन वर्षात हा महामार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

Nitin Gadkari! Nitin Gadkari’s big announcement about Nashik-Pune highway

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात