कुसुमाग्रजांचे नाव दिले, पण सावरकरांचे नाव न देण्याचा देण्याचा अट्टाहासातून दोन्ही महनीयांची उंची कमी करत नाही का? फडणवीसांचा परखड सवाल


प्रतिनिधी

मुंबई : नाशिकच्या साहित्य संमेलन नगरी “कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण सावरकर यांचे नाव देण्याचा अट्टाहास आतून या दोन्ही महान व्यक्तींची यांची उंची आपण आपल्या कृतीतून कमी करत नाही का? असा परखड सवाल माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे जिथे आदर्शांचा अपमान होतो तिथे जाण्यात काय मतलब?, असाही सवाल त्यांनी केला आहे. Devendra Fadanavis targets sahitya samelan organizers for not hounering savarkar

देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक येथे सुरू झालेल्या ९४ व्या अ.भा.साहित्य संमेलनास शुभेच्छा देताना, या साहित्यनगरीला नाव देताना, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा नावाचा उल्लेख टाळण्यात आल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. याचबरोबर त्यांनी या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागत केले आहे.

“मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?, असे फडणवीस म्हणाले आहेत.



अखिल भारतायी मराठी साहित्य संमेलनाला माझ्या खूप खूप शुभेच्छा! केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवि, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?” असा सवाल देखील फडणीसांनी केलेला आहे. याचबरोबर “नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा आहे.

मराठी साहित्य संमेलन, मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली आहे.

तर, “या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनीयांची उंची आपण कमी करीत नाही का? असो, आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे. असंही फडणवीस यांनी बोलून दाखवलं आहे.

Devendra Fadanavis targets sahitya samelan organizers for not hounering savarkar

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात