विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारतीय नौदलाच्या अनेक मोठ्या युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा नौदलाचे प्रमुख ॲडमिरल आर. हरीकुमार यांनी केली आहे. नौदलाच्या पंधरा मोठ्या युद्धनौकांवर २८ महिला अधिकाऱ्यांना तैनात करण्यात आले असून ही संख्या आणखी वाढत जाणार आहे.Now nave will get women officers
पत्रकार परिषदेत बोलताना हरीकुमार म्हणाले की,‘‘ महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी सोपविण्यास नौदल सज्ज आहे. भारत सरकारप्रमाणेच नौदलाचे ध्येय देखील महिलांचे सक्षमीकरण करणे हे आहे. महिलांना अतिरिक्त संधी मिळावी म्हणून आम्ही विविध उपाययोजना आखल्या आहेत.
आता जवळपास सर्व मोठ्या युद्धनौकांवर महिला अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.’’नौदलातील माहिती आणि तंत्रज्ञान विभागामध्ये पुढील वर्षी जून महिन्यापासून महिला अधिकाऱ्यांची भरती करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले. विनाशिका, गायडेड क्षेपणास्त्रांना नेस्तनाबूत करणारी यंत्रणा आणि टॅंकर यांचे नेतृत्व महिला अधिकारी करतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App