विनम्रता हे आपल्या मधुर वाणीचे एक प्रगत रूप आहे, ती एक सकारात्मक भाषा आणि मनोभूमिका आहे. विनम्रता ही स्वतंत्र अशी मनोभूमिका नाही. ती मनुष्य स्वभावातील अनेक चांगल्या समजल्या जाणाऱ्या भूमिका आणि भावनांचे एक संयुग आहे. Speak politely, the front will listen too
त्यामुळे ती जगण्याचा दृष्टिकोन तयार करणारी एक मनोभूमिका आहे. यात कृतज्ञता आहे, आदर आहे, समोरचा कसा का असेना त्याच्या मूलभूत हक्कांचा आणि अधिकारांचा स्वीकार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मनोभूमिका तयार होण्यात मीपण, अहंभाव सहजपणे गळून जाण्याची प्रक्रिया आहे. विद्या विनम्रता देते, विनम्रतेमुळे आपली पात्रता वाढते, पात्रतेमुळे धन मिळवता येते, अशा मिळवलेल्या धनामुळे स्वधर्माचे पालन करता येते आणि या सगळ्यामुळे सुख प्राप्त होते.
इथे धन म्हणजे फक्त पैसे असा अर्थ नाही, तर जगण्यासाठी आवश्यक सर्व साधनसंपत्ती असा अर्थ घेऊया. म्हणजेच जे शिक्षण आपण घेतले आहे त्यामुळे आपली गुणवत्ता वाढणार आहे की नाही, आपण जगण्यास पात्र आहोत की नाही हे या विनम्र भूमिकेमुळे ठरते. काही रोजच्या व्यवहारातील उदाहरणे पाहू. इतका शिकलास पण कसे बोलायचे हे अजून समजत नाही, हे वाक्य आपण अनेक वेळा विविध संदर्भाने ऐकतो.
खास करून एरवी चांगले मार्क मिळवणारा किंवा शिक्षण आणि नोकरी याबाबतीत शिखरावर असलेला जेव्हा अपमानकारक, उर्मटपणे बोलत असेल तर हे हमखास बोलले जाते. संचालक, व्यवस्थापक या पदावरची माणसे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या माणसांशी कशी वागतात हे ही नेहमी पहिले जाते. तसेच आपल्यापेक्षा वयाने, मानाने मोठ्या लोकांशी आपण कसे बोलतो, जिथे वाद आहेत, मतमतांतरे आहेत तिथे कसे बोलले जाते, तिथेही या मनोभूमिकेची परीक्षा होते. तर कित्येक वेळा अमुक अमुक सगळे करतो, हुशार आहे पण बोलण्याने सगळे घालवतो, असेही म्हणतो आपण. आपण जर चांगले बोललो तर समोरचाही नीट ऐकतो. ऐकणाऱ्याच्या कानाला बरे वाटेल असे बोलणे फार गरजेचे असते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App