मुकुल रॉय अजूनही मनाने भाजपामध्येच, तृणमूलच्या पत्रकार परिषदेत म्हणाले पोटनिवडणुकांत भाजपाचाच विजय होईल!

विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : भारतीय जनता पक्ष सोडून तृणमूल कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला असला तरी मुकुल रॉय अद्यापही मनाने भाजपमध्येच आहेत. त्यामुळे तृणमूल कॉँग्रेसच्या पत्रकार परिषदेत बोलताना त्यांची जीभ घसरली आणि म्हणाले पोटनिवडणुकीत भाजपचाच विजय होईल.Mukul Roy is still in the mind of the BJP, Trinamool leader said in the press conference that the BJP will win the by-elections!

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत मुकुल रॉय यांनी कृष्णानगर उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपकडून निवडणूक जिंकली होती. मात्र, त्यानंतर ते तृणमूल कॉँग्रेसमध्ये गेले होते. सध्या तृणमूल कॉँग्रेसचे नेते असलेले रॉय पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आगामी विधानसभा पोटनिवडणूक भाजपचा जिंकेल.



त्यांच्या या टिप्पणीमुळे पत्रकारांना आश्चर्याचा धक्का बसला. उपस्थितांमध्ये यामुळे गोंधळ उडाला. त्यावर आपली चूक दुरुस्त करत रॉय म्हणाले, तृणमूल काँग्रेस नि:संशयपणे पोटनिवडणूक जिंकेल. भाजपला पराभूत केले जाईल. ‘माँ माती मनुष’ पक्ष (टीएमसी) कायम राहिल. त्रिपुरामध्येही तृणमूलचाच विजय होईल. ममता बॅनजी याच पश्चिम बंगालचे नेतृत्व करणार आहे. राज्यात कोठे भाजप असेल तेथे त्यांना नेस्तनाबूत केले जाईल.

मुकुल रॉय स्थापनेपासून तृणमूल कॉँग्रेसमध्ये होते. मात्र, २०१८ मध्ये पक्षप्रमुख ममता बॅनर्जी यांच्याशी मतभेद झाल्यामुळे त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. २०१९ मध्ये भाजपाच्या लोकसभा विजयात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र, मे महिन्यात पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कॉँग्रेसने मोठा विजय मिळविल्यावर ते पुन्हा पक्षात परतले होते.

भाजपचे प्रवक्ते शमिक भट्टाचार्य म्हणाले, मुकुल रॉय यांनी कृष्णानगर उत्तरमधील आपल्या मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी त्यांची विश्वासार्हता गमावली आहे. पण आता ते सत्य बोलले आहेत. ते प्रचंड मानसिक तणावाखाली असल्याने सत्य बाहेर आले आहे. मुकुल रॉय यांची आमदारकी अपात्र ठरविण्यासाठी भाजपा सातत्याने प्रयत्न करत राहिल.

Mukul Roy is still in the mind of the BJP, Trinamool leader said in the press conference that the BJP will win the by-elections!

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात