दहशतवादाविरुध्द लढ्यातील शहीदांना जम्मू-काश्मीरमध्ये अनोखी श्रध्दांजली, शाळांना शहीदांचे नाव देऊन आठवण ठेवणार जागी


विशेष प्रतिनिधी

श्रीनगर: दहशतवाद्यांविरुध्दच्या लढ्यात प्राणाची आहुती दिलेल्या शहीदांना जम्मू-काश्मीरमध्ये अनोखी श्रध्दांजली वाहिली जाणार आहे. राज्यातील शाळांचे शहीदांच्या नावाने नामकरण करून त्यांची आठवण जागी ठेवणार आहे.Unique tribute to the martyrs of the war on terror in Jammu and Kashmir, schools will be named after the martyrs

भारतीय सैन्य, पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) अनेक जवानांनी देशासाठी प्राणांची आहुती दिली. त्यांना श्रध्दांजलीवाहिली जाणार आहे.जम्मूच्या विभागीय आयुक्तांनी जम्मू, दोडा, रियासी, पुंछ, राजौरी, कठुआ, सांबा, रामबन, किश्तवाड आणि उधमपूर जिल्ह्यांच्या उपायुक्तांना पत्र लिहून शासकीय शाळांची यादी तयार करण्यास सांगितले आहे. त्यांचे नामकरण शहीदांच्या नावाने केले जाणार आहे.



जम्मू आणि काश्मीर सरकारने स्थानिक अधिकाऱ्यांना जिल्हास्तरावर एक समिती स्थापन करण्यास सांगितले आहे. समितीमध्ये भारतीय लष्कर, एसएसपी, एडीसी, डीपीओ किंवा एसी पंचायतीचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. जिल्हा स्तरावर यादी अंतिम करण्यासाठी लष्करातील प्रतिनिधींचाही समितीमध्ये समावेश करण्यात येणार आहे.

यापूर्वी पंजाब सरकारने राज्यातील विविध जिल्ह्यांतील 14 शाळांचे नामकरण स्वातंत्र्य सैनिक आणि इतर नामांकित व्यक्तींच्या नावावर ठेवण्याचा निर्णय घेतला . यातून त्यांच्या कर्तृत्वाचा, योगदानाचा आणि राष्ट्रासाठी बलिदानांचा सन्मान होईल, असे म्हटले आहे.

Unique tribute to the martyrs of the war on terror in Jammu and Kashmir, schools will be named after the martyrs

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात