पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा, राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलून आता असेल मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार

PM Modi announced, Rajiv Gandhi Khel Ratna Award will now be Major Dhyan Chand Khel Ratna Award

Major Dhyan Chand Khel Ratna Award : भारताच्या क्रीडा इतिहासातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. मेजर ध्यानचंद यांनी भारताला जगात एक वेगळी ओळख दिली आणि आता भारत सरकारने त्यांच्या नावाने सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे, त्यांना सर्वात मोठा सन्मान दिला आहे. खेळलरत्न पुरस्कार क्रीडा विश्वात मोठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार बदलून आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्यात आले आहे. PM Modi announced, Rajiv Gandhi Khel Ratna Award will now be Major Dhyan Chand Khel Ratna Award


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारताच्या क्रीडा इतिहासातील सर्वात प्रभावी व्यक्तिमत्त्व ज्यांना हॉकीचे जादूगार म्हणून ओळखले जाते. मेजर ध्यानचंद यांनी भारताला जगात एक वेगळी ओळख दिली आणि आता भारत सरकारने त्यांच्या नावाने सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे, त्यांना सर्वात मोठा सन्मान दिला आहे. खेळलरत्न पुरस्कार क्रीडा विश्वात मोठी कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. या पुरस्काराचे नाव राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार बदलून आता मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार करण्यात आले आहे.

पंतप्रधान मोदींकडून घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशवासीयांना ही माहिती दिली. त्यांच्या ट्विटर हँडलवरून एका पोस्टमध्ये लिहिले होते की, मेजर ध्यानचंद हे भारतातील महान खेळाडूंपैकी एक आहेत आणि त्यांच्या नावावर खेळाच्या सर्वात मोठ्या पुरस्काराचे नाव देणे योग्य ठरेल.

त्यांनी ट्विटर संदेशात असे लिहिले आहे की, मेजर ध्यानचंद हे भारतीय खेळाडूंचे अग्रणी आहेत, ज्यांनी भारताला अभिमान आणि सन्मान दिला आहे. देशातील सर्वात मोठा क्रीडा पुरस्कार त्यांच्या नावावर ठेवणेच योग्य राहील.

हा मोठा संदेश हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये पंतप्रधानांच्या ट्विटर हँडलवर जारी करण्यात आला आहे. मेजर ध्यानचंद यांनी भारतीय हॉकीला जगभरात प्रसिद्ध केले. ऑलिम्पिकमध्ये भारताला अनेक सुवर्णपदके जिंकून देणाऱ्या या खेळाडूची हॉकी स्टिक मॅग्नेटची मानली जात होती. असे म्हटले जायचे की, एकदा चेंडू स्टिकला लागला की तो चुंबकासारखा चिकटायचा आणि कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला तो काढून घेणे अशक्य होऊन जायचे.

खेलरत्न पुरस्कार

क्रीडा जगतात दिला जाणारा हा सर्वोच्च भारतीय क्रीडा सन्मान आहे. ज्या खेळाडूंनी आपापल्या खेळात अमूल्य योगदान दिले आहे त्यांना खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले जाते. ज्या खेळाडूला हा सन्मान मिळतो, त्याला 25 लाखांची रक्कम आणि प्रमाणपत्र दिले जाते.

PM Modi announced, Rajiv Gandhi Khel Ratna Award will now be Major Dhyan Chand Khel Ratna Award

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात