कर्जतमधील वृक्षतोडीचा वाद चिघळणार? मनोज जरांगे आंदोलनात उतरणार!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : टाेरंट प्रकल्पासाठी कर्जत व भीमाशंकर अभयारण्यातील कथित वृक्षताेडीविराेधातील आंदाेलनात आता मराठा आंदाेलक मनाेज जरांगे पाटीलही उतरणार आहेत. बुधवारी दुपारी आपण कर्जत येथे जाणार असल्याचे मनाेज जरांगे यांनी सांगितले.Manoj Jarange

जरांगे म्हणाले की, राज्यभरातून कर्जत आणि भीमाशंकरमधील वृक्षतोडीला तीव्र विरोध होत आहे. झाडे तोडू नयेत, हेच सर्वांचे म्हणणे आहे. ज्या झाडांमुळे आपण मोकळा श्वास घेऊ शकतो, ती झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी संपूर्ण राज्यातून विरोध व्हायला हवा. सत्ताधाऱ्यांची नियतच खराब झाली आहे, यावर आता कोणी काही करू शकत नाही. यासाठी सुद्धा पडद्यामागे काहीतरी काळेबेरे ठरले असणार. ‘झाडे तोडा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असेच सांगितले गेले असणार.

जरांगे पाटील म्हणाले की, लोकांनी यांच्याविरोधात उभे राहिले पाहिजे आणि वृक्षतोडीला विरोध करण्यासाठी सर्वांनी आपले पाठबळ दिले पाहिजे. उद्या दुपारी 12 वाजता आम्ही स्वतः तिथे जाणार आहोत. महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांनी सुद्धा या विनाशाच्या विरोधात उभे राहिले पाहिजे. एखाद्या प्रकल्पाच्या नावाखाली झाडे तोडण्याचा हट्ट धरला जात असेल, तर सरकारने सुद्धा त्याला विरोध केला पाहिजे. महायुतीमधील जर एकाच व्यक्तीचा ‘झाडे तोडावीत’ असा आग्रह असेल, तर संपूर्ण महायुतीने कशासाठी बदनाम व्हावे?



मराठ्यांचे आंदोलन चिरडण्याचे काम जसे सुरू आहे, तशीच दडपशाहीची पद्धत प्रत्येक ठिकाणी सरकारकडून वापरली जात आहे असा आराेप करताना जरांगे पाटील म्हणाले, मराठ्यांचे आंदोलन चिरडण्यासाठी पडद्यामागे भाजपचे काही लोक किती भयंकर षडयंत्र रचत आहेत, हे सर्वच पक्षांसाठी आणि महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे. आम्ही याचा संपूर्ण छडा लावणार आहोत. माझ्यावर खूनी हल्ले करायचे, मला बदनाम करायचे, याचा छडा आम्ही लावणारच.
जरांगे पाटील म्हणाले की, व्हायरल झालेली ऑडिओ क्लिपचा तपास अत्यंत खोलवर झाला पाहिजे.

माझ्याकडे अजूनही बरीच महत्त्वाची माहिती येत आहे. या ऑडिओ क्लिपबद्दल हे सरकार नेमकी काय भूमिका घेते, ते आधी बघू द्या. यांनी जर ही क्लिप खोटी ठरवली, तर मग बघूच किती क्लिप खोट्या ठरवतात. मला नाही वाटत की ते ही क्लिप खोटी ठरवतील, आता पुढे काय होते ते बघूयात. माझ्याकडे अनेक गोष्टी आणि पुरावे आहेत, ते जर मी लोकांसमोर आणले तर हे लोक वेडे होतील.

Manoj Jarange to join protest against tree felling, visit Karjat

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात