दिल्लीत राहुल गांधींकडून विरोधकांची एकजूट; बेंगळुरूरमध्ये पवारांच्या भाजप सरकारशी पाटबंधारे प्रकल्पांवर वाटाघाटी; पवार “साधतात” नेमके मुहूर्त


नाशिक : एकीकडे काँग्रेसचे खासदार राहुल गांधी स्वतः पुढाकार घेऊन संसदेत विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करून मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत, तर दुसरीकडे शरद पवार हे नुकतेच केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांना भेटून आले.आज त्यांनी बेंगळुरूमध्ये जाऊन कर्नाटकचे भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याशी महाराष्ट्र आणि कर्नाटक यांच्या सामायिक अप्पर कृष्णा प्रकल्प तसेच दूधगंगा प्रकल्प या पाटबंधारे प्रकल्पांसंदर्भात वाटाघाटी केल्या. यावेळी त्यांच्या समवेत महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील होते. Rahul Gandhi in Delhi Negotiations with Pawar’s BJP government on irrigation projects in Bangalore; Pawar “accomplishes” the exact moment

राहुल गांधी यांचे गेल्या काही दिवसांपासून, विशेषतः ममता बॅनर्जी यांच्या दिल्ली दौऱ्यापासून विरोधकांची एकजूट करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सहभागी होताना दिसत आहेत. परंतु स्वत: शरद पवार मात्र राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली कुठल्याही बैठकीत अथवा आंदोलनात सामील झालेले दिसलेले नाहीत.



संजय राऊत हे देखील शिवसेनेच्या वतीने राहुल गांधी यांच्याशी जवळीक साधताना दिसतात. पण शरद पवार हे राहुल गांधी यांनी बोलाविलेल्या बैठकीत किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली कुठल्याही आंदोलनात सामील होताना दिसत नाहीत. आज जंतर मंतरवर देखील ते सर्व विरोधी खासदारांवर बरोबर गेले नाहीत. उलट पवारांनी आज जयंत पाटील यांच्यासह बंगळुरूमध्ये कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दुध गंगा आणि अप्पर कृष्णा प्रकल्प यावर चर्चा झाली, ही माहिती बसवराज बोम्मई यांनी पत्रकारांना दिली.

याआधी पवार यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीचा मुहूर्त पवारांनी राहुल गांधीच्या ब्रेकफास्ट मिटिंगचाच ठेवला होता. त्यांनी राष्ट्रवादीच्या खासदारांना राहुल गांधींच्या ब्रेकफास्ट मिटींगला पाठवून दिले आणि आपण स्वतः अमित शहांकडे दुपारी चहापानाला गेले होते. ही भेट साखरेच्या प्रश्नासंदर्भात असल्याची चर्चा अधिकृतरित्या राष्ट्रवादीने केली होती. परंतु त्यामागे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागे लागलेली ईडी बाजूला करण्याचा विषय होता, असेही बोलले गेले.

परंतु, यापैकी काहीही असले तरी राहुल गांधी किंवा ममता बॅनर्जी एकीकडे विरोधकांची एकजूट करण्याचा प्रयत्न करत असताना शरद पवार मात्र दिल्लीत भाजपचे नेते अमित शहा आणि कर्नाटकात भाजपचे मुख्यमंत्री बसवराज मुंबई यांच्या भेटीगाठी घेऊन वाटाघाटी करतात. यातून ते काँग्रेसला आणि राहुल गांधींना काही वेगळा संदेश देऊ इच्छितात, असेच स्पष्ट होते आहे.

महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यात पूर येतो ते रोखण्यासाठी त्यामुळे अप्पर कृष्णा प्रकल्प आणि दूधगंगा प्रकल्प यांचे महत्त्व नक्कीच आहे. यावर कर्नाटक सरकारची वाटाघाटी केल्या पाहिजेत. याविषयी देखील शंका नाही. परंतु पूर किंवा हे दोन्ही प्रकल्प हे विषय अजिबात नवीन नाहीत. त्याची चर्चा पवार यांनी बेंगळुरूमध्ये जाऊन नेमकी आजच करणे याचा अर्थ काय घ्यायचा? दिल्लीत विरोधकांच्या एकजुटीत सामील होऊन नंतर कर्नाटक सरकारशी वाटाघाटी करता येणार नाहीत का? असे शेलके सवाल काही राजकीय निरीक्षक विचारत आहेत.

Rahul Gandhi in Delhi Negotiations with Pawar’s BJP government on irrigation projects in Bangalore; Pawar “accomplishes” the exact moment

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात