Rahul Gandhi Poetry On Farmers : राहुल गांधींची शेतकऱ्यांसाठी कविता, ‘पीएम हमारे दो के, फिर किसान का क्‍या?’

Rahul Gandhi Poetry On Farmers taunts PM Modi Through Tweet

Rahul Gandhi Poetry On Farmers : तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या आंदोलक प्रतीकात्मक ‘किसान संसद’ चालवत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांचे नेते शेतकऱ्यांना पाठिंबा दाखवण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचले. Rahul Gandhi Poetry On Farmers taunts PM Modi Through Tweet


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : तीन नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. दिल्लीच्या जंतर मंतरवर सध्या आंदोलक प्रतीकात्मक ‘किसान संसद’ चालवत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि इतर विरोधी पक्षांचे नेते शेतकऱ्यांना पाठिंबा दाखवण्यासाठी जंतर मंतरवर पोहोचले.

यानंतर राहुल गांधी यांनी ट्विटरवर फोटोसह कविता शेअर केली. कवितेच्या माध्यमातून त्यांनी पीएम मोदींवर निशाणा साधला आणि स्वत: शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगितले.

शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी किसान संसदेत पोहोचलेल्या नेत्यांमध्ये राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल, शिवसेनेचे संजय राऊत, राजदचे मनोज झा, सीपीआयचे विनय विश्वम, समाजवादी पक्षाचे एसटी हसन आणि इतर विरोधी नेते उपस्थित होते.

तत्पूर्वी, संसद भवनातील खर्गे यांच्या सभागृहात झालेल्या बैठकीनंतर विरोधी सदस्यांनी शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ‘जंतर मंतर’वर पोहोचण्याचा निर्णय घेतला. पेगासस, कृषी कायदे आणि इतर काही मुद्द्यांवर संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून दोन्ही सभागृहांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. हे अधिवेशन 19 जुलैपासून सुरू झाले होते, परंतु आतापर्यंत दोन्ही सभागृहांचे कामकाज विस्कळीत झाले आहे.

Rahul Gandhi Poetry On Farmers taunts PM Modi Through Tweet

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात