टायगर श्रॉफ प्रकरणातील आरोपींना मकोका लावण्यास कोर्टाकडून परवानगी

विशेष प्रतिनिधी

मुंबई : अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या गोळीबार प्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सर्व 11 आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. मंगळवारी सक्षम प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर या गुन्ह्यात मकोकातील कलम 3(1)(ii), 3(2) आणि 3(4) जोडण्यात आली. त्यानंतर या सर्वांना बुधवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष मकोका कोर्टात रिमांडसाठी हजर करण्यात आलं होतं.

या प्रकरणी मकोका लावल्यामुळे या आरोपींना जामीन मिळणं कठीण होणार आहे. गुन्हे शाखेकडे आता 30 दिवसांपर्यंत त्यांची कोठडी ठेवण्याचा पर्याय उपलब्ध झालाय. तसंच याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी आता 90 ऐवजी 180 दिवसांची मुदत मुंबई पोलिसांना मिळणाराय. मकोका अंतर्गत, डीसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे आरोपींनी डीसीपीसमोर दिलेले जबाब हे दंडाधिकाऱ्यांसमोर दिलेले अधिकृत जबाब मानले जातील. तसंच खटल्यादरम्यान, आरोपींनी पोलिसांना दिलेले जबाब ते मागे घेऊ शकणार नाहीत.



याप्रकरणी आतापर्यंत फूल सिंह, रेहान अन्सारी, ऋतिक महतो हे तिघे हल्लेखोर तसंच त्यांना हत्यारं आणि इतर रसद पुरवल्याबद्दल राधा वर्मा, बबिता राव, कुणाल जामिनसिंह यांच्यासह सुमित सरोलियाला दिल्लीहून अटक केलीय. तर, अंकित उर्फ सरपंच खटक, समीर खत्री, जतिन पांचाल आणि प्रांजल ठकराल अशा एकूण 11 जणांना देशातील विविध राज्यांतून (राजस्थान, दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश) अटक करण्यात आलीय.

18 ऑक्टोबर 2026 रोजी मुंबईतील जुहू परिसरातील ‘पुष्पा पार्क’ जवळ एका दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी टायगर श्रॉफच्या कारवर बेछूट गोळीबार केला होता. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावला, मात्र त्याचा ड्रायव्हर फिरदौस बलोच आणि जवळच उपस्थित असलेले उमेश चव्हाण जखमी झाले होते. या घटनेनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीनं या हल्ल्याची जबाबदारी घेत एक धमकीचा संदेश सोशल मीडियावर जारी केला होता.

हा हल्ला केवळ वैयक्तिक शत्रुत्वातून झालेला नसून, त्यामागे धमकावून खंडणी वसूल करणं, समाजात दहशत निर्माण करणं आणि आपल्या टोळीचं वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या उद्देशानं रचलेल्या संघटित कटाचा हा एक भाग होता. आरोपींनी याआधी सलमान खान आणि इतर काही बॉलिवूड सेलिब्रिटींच्या हालचालींवर पाळत ठेवली होती, परंतु तिथे कडक सुरक्षा असल्यानं त्यांनी कमी सुरक्षा असलेल्या टायगर श्रॉफला आपलं लक्ष्य केलं. या कटाचा मुख्य सूत्रधार अनिल पंडित हा अद्यापही फरार आहे.

Court allows MCOCA charges against accused in Tiger Shroff case

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात