उजनीच्या काठावरील राणा सूर्यवंशीच्या आलिशान फार्म हाऊसची चर्चा

हेलिपॅड, उंच सुरक्षा भिंती अन् खासगी सुरक्षा रक्षक;

विशेष प्रतिनिधी

बारामती : राणा सूर्यवंशी याच्यावरील हल्ल्यानंतर उजनी धरणाच्या काठावर कालठण (ता. इंदापूर ) असलेल्या त्याच्या आलिशान फार्म हाऊसचीही चर्चा सुरू झाली आहे. प्रशस्त परिसर, उंच सुरक्षा भिंती आणि खासगी सुरक्षारक्षकांचा पहारा यामुळे सर्वसामान्यांच्या सहज नजरेस न पडणाऱ्या या फार्म हाऊसबाबत आता जमिनीची मालकी, बांधकामे आणि हेलिपॅडच्या बांधकाम परवानग्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. Rana Suryavanshi

उजनी धरणालगत असलेल्या या फार्म हाऊसचा परिसर मोठा असून, त्याभोवती उंच सुरक्षा भिंती उभारण्यात आल्याचे सांगितले जाते. त्यामुळे फार्म हाऊसच्या आतील हालचालींबाबत बाहेरच्या व्यक्तींना सहज माहिती मिळत नाही. या ठिकाणी खासगी सुरक्षारक्षकांचा पहारा असल्याचीही माहिती आहे. मात्र, फार्म हाऊसच्या बांधकामासाठी कोणत्या परवानग्या घेण्यात आल्या आहेत, तसेच परिसरातील जमिनीचा वापर नियमानुसार केला जात आहे का, याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.



जमिनीच्या मालकीचा वाद चर्चेत

या फार्म हाऊससाठी वापरण्यात आलेल्या जमिनीच्या मालकीबाबतही आरोप केले जात आहेत. सूर्यवंशी याने आपल्या सासऱ्यांची कालठण येथील जमीन बळकावून त्यावर आलिशान फार्म हाऊस उभारल्याची चर्चा आहे. त्यामुळे जमिनीची मालकी, हस्तांतरणाची कागदपत्रे आदी गोष्टींची तपासणी गरजेची आहे. उजनी धरणाच्या गाळपेर जमिनीवर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी हेलिपॅड तयार करण्यात आल्याचीही चर्चा आहे. या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले आहे का, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत का आणि संबंधित जमिनीचा वापर कोणत्या अटींवर केला जात आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

गाड्यांची वर्दळ कमी; कामगारांनाही सुट्टी?

हल्ल्यापूर्वी फार्म हाऊसवर नियमितपणे येणाऱ्या वाहनांची वर्दळ आता कमी झाल्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. तसेच तेथील कामगारांना सुट्टी देण्यात आल्याचेही सांगितले जाते. तसेच खासगी सुरक्षा राक्षकांचा पहारा देखील कडक करण्यात आला आहे.

Rana Suryavanshi’s luxurious farmhouse on the banks of the Ujani reservoir

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात