मुकुल रॉय यांची आमदारकी धोक्यात, शुभेंदू अधिकारींचा विधानसभा अध्यक्षांना अर्ज, पक्षबदल कायद्यान्वये कारवाईची मागणी

Mukul Roys MLA status in danger, Subhendu Adhikari application to Assembly Speaker, demand for action under party change law

Mukul Roys MLA status in danger : 7 दिवसांपूर्वी 11 जून रोजी भाजपकडून तृणमूलमध्ये परतलेले मुकुल रॉय यांची आमदारकी अडचणीत आली आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार शुभेंदू अधिकारी यांनी मुकुल रॉय यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांना अर्ज केला आहे. Mukul Roys MLA status in danger, Subhendu Adhikari application to Assembly Speaker, demand for action under party change law


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : 7 दिवसांपूर्वी 11 जून रोजी भाजपकडून तृणमूलमध्ये परतलेले मुकुल रॉय यांची आमदारकी अडचणीत आली आहे. पश्चिम बंगालमधील विरोधी पक्षनेते आणि भाजपचे आमदार शुभेंदू अधिकारी यांनी मुकुल रॉय यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी विधानसभा अध्यक्ष बिमान बॅनर्जी यांना अर्ज केला आहे.

शुभेंदू यांनी आपल्या अर्जात मुकुल रॉय यांच्यावर पक्षबदल कायद्यानव्ये अपात्रतेची मागणी केली आहे. भाजपचे आमदार मनोज तिग्गा यांनी ही माहिती दिली.

मुकुल रॉय यांची घरवापसी

11 जून रोजी भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय आणि त्यांचा मुलगा सुभ्रंश रॉय तृणमूलमध्ये दाखल झाले होते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे खासदार पुतणे अभिषेक बॅनर्जी यांच्या उपस्थितीत सुमारे 4 वर्षांनंतर ते तृणमूलमध्ये परतले. यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी तृणमूल सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

आपले जुने सहकारी परत आल्यावर ममतांनी म्हटलं होतं की, मुकुल यांनी माझ्या किंवा पक्षाविरोधात कधीही खोटी विधाने केली नाहीत. ममता म्हणाल्या की, ज्यांनी पक्षावर टीका केली, भाजप आणि पैशांसाठी निवडणुकीआधी पक्षाला धोका दिला त्यांची घरवापसी होणार नाही, ते गद्दार आहेत.

Mukul Roys MLA status in danger, Subhendu Adhikari application to Assembly Speaker, demand for action under party change law

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात