Children Vaccine Covovax : ऑक्टोबरमध्ये येणार मुलांची लस, अमित शहांशी भेटीनंतर सीरमच्या अदार पुनावालांची घोषणा

Children vaccine Covovax will be launched in October, SII CEO Adar Poonawalla announced after meeting Amit Shah

Children vaccine Covovax : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदार पूनावाला यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अदार पूनावाला म्हणाले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीरमची ‘कोव्होव्हॅक्स’ भारतात लॉन्च केली जाईल. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी भारतात येईल. ते पुढे म्हणाले की, पुढील वर्षी म्हणजेच 2022 च्या पहिल्या तिमाहीत ही लस 12 वर्षाखालील मुलांसाठीदेखील लाँच केली जाईल. यावरून सीरममध्ये कोणतेही आर्थिक संकट नाही. भारत सरकार पूर्ण सहकार्य करत आहे. Children vaccine Covovax will be launched in October, SII CEO Adar Poonawalla announced after meeting Amit Shah


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदार पूनावाला यांनी शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना अदार पूनावाला म्हणाले की, ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत सीरमची ‘कोव्होव्हॅक्स’ भारतात लॉन्च केली जाईल. ही लस 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी भारतात येईल. ते पुढे म्हणाले की, पुढील वर्षी म्हणजेच 2022 च्या पहिल्या तिमाहीत ही लस 12 वर्षाखालील मुलांसाठीदेखील लाँच केली जाईल. यावरून सीरममध्ये कोणतेही आर्थिक संकट नाही. भारत सरकार पूर्ण सहकार्य करत आहे.

दरमहा 13 कोटी लसींचा पुरवठा

लस वितरणाबाबत विचारले असता. ते म्हणाले की आम्ही दरमहा 13 कोटी लस देत आहोत. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) ने अलीकडेच काही अटींच्या अधीन दोन ते 17 वर्षे वयोगटातील मुलांवर ‘कोव्होवॅक्स’ लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्यांना परवानगी देण्याची शिफारस केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, 10 ठिकाणी 920 मुलांना चाचणीत समाविष्ट केले जाणार असल्याचे सांगितले गेले, ज्यात 12-17 आणि 2-11 वयोगटातील प्रत्येक वर्गात 460 मुले समाविष्ट केली जातील.

लेट स्टेज ट्रायल

नोव्हावॅक्स लसीच्या शेवटच्या टप्प्यातील चाचणीमध्ये, असे दिसून आले आहे की ही लस SARS-Cov-2 मुळे होणाऱ्या मध्यम आणि गंभीर आजारावर 90.4 टक्के प्रभावी आहे. अशा स्थितीत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानेही मुलांवर नोव्हाव्हॅक्सची चाचणी जुलैपासून सुरू करण्यास सांगितले होते. ऑगस्ट 2020 मध्ये, कराराअंतर्गत, नोव्हावॅक्सने सीरमला कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये तसेच भारतामध्ये लस तयार आणि पुरवठा करण्यासाठी परवाना दिला आहे.

नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) व्ही के पॉल यांनी अलीकडेच सांगितले की, सार्वजनिकरीत्या उपलब्ध डेटा सूचित करते की नोव्हावॅक्स लस सुरक्षित आणि अत्यंत प्रभावी आहे. ते म्हणाले होते, “उपलब्ध डेटावरून आपण जे पाहत आहोत ते म्हणजे लस अतिशय सुरक्षित आहे. आता ही प्रभावी ठरणारी लस भारतातील सीरम इन्स्टिट्यूटद्वारे तयार केली जाईल.”

Children vaccine Covovax will be launched in October, SII CEO Adar Poonawalla announced after meeting Amit Shah

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात