मुंबईकर म्हणालेत, “थुंकीन तिथे पैसे काढीन…!!”; भरलाय ३९ लाख १३ हजार रूपये दंड


वृत्तसंस्था

मुंबई : “लाथ मारीन तिथे पाणी काढीन”, अशी मराठीत म्हण आहे. पण मुंबईकर त्याच्या पुढचे आहेत. ते म्हणतात, “थुंकीन तिथे पैसे काढीन.” मुंबईकर नुसते थुंकले तर त्यांनी 39 लाख रुपये जमा केलेत. considering spitting in public spread various deseases like corona

ही काही साधी गोष्ट घडली नाही. त्याचे असे झाले, मुंबईत कोरोना काळात महापालिकेने आणि पोलिसांनी नियम काढला. रस्त्यावर थुंकलात तर दोनशे रुपये दंड झाला. पण मुंबईकरांनी रस्त्यावर थुंकणे काही थांबवले नाही.

एक दोन नव्हे तर 19000 मुंबईकरांनी रस्त्यावर नुसते थुंकून महापालिकेला 39 लाख 13 हजार रुपये “मिळवून” दिले आहेत. अर्थात ते दंडाच्या रूपाने आहेत. गेल्या नऊ महिन्यांमध्ये हा दंड गोळा झाला आहे. मुंबईकरांची थुंकण्याची सवय किती मोठ्या प्रमाणावर पसरली आहे आणि घातक आहे हे यातून दिसते आहे.

थुंकीतून कोरोनाचे जंतू पसरू शकतात किंवा अन्य रोगांचे जंतूही पसरतात, हे कोणी लक्षात घेत नाही. उठले… रस्त्यावर आले की थुंकले… ही काहींची प्रवृत्ती असते. काही सवय जाता जात नाहीत. तसेच ही थुंकण्याची सवय आहे. मुंबईकरांनी गेल्या नऊ महिन्यांमध्ये 39 लाख 13 हजार रुपये दंड भरलाय. पण त्यांची थुंकण्याची सवय अजून काही गेलेली नाही ही चिंतेची बाब आहे.

considering spitting in public spread various deseases like corona

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात