सोमेश्वरची पहिली उचल ३,९५१ रुपये जाहीर एफआरपीपेक्षा प्रतिटन ४८४ रुपये अधिक

Someshwar’s

विशेष प्रतिनिधी

 

बारामती : ऊसदराच्या पहिल्या हप्त्यावरून शेतकरी संघटनांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने प्रतिटन ३ हजार ९५१ रुपयांची पहिली उचल जाहीर केली आहे. शासनाने निश्चित केलेल्या एफआरपीपेक्षा तब्बल ४८४ रुपये अधिक रक्कम देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, पुणे जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये हा सर्वाधिक पहिला हप्ता असल्याचा दावा कारखाना प्रशासनाने केला आहे. अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी रविवारी (ता.२२) ही घोषणा केली.Someshwar’s

सोमेश्वर कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम वेगाने सुरू असून, अवघ्या ३८ दिवसांत कारखान्याने ३ लाख ६० हजार १११ मेट्रिक टन उसाचे गाळप केले आहे. यातून सरासरी ११.२५ टक्के साखर उतारा मिळवत ४ लाख १ हजार २५० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता ७ हजार ५०० टन असताना प्रत्यक्षात सरासरी ९ हजार ४७६ टन प्रतिदिन गाळप सुरू असल्याचेही व्यवस्थापनाने स्पष्ट केले. चालू हंगामासाठी कारखान्याची एफआरपी प्रतिटन ३ हजार ४६७ रुपये निश्चित झाली आहे. मात्र संचालक मंडळाने सभासद, बिगरसभासद आणि गेटकेनधारक अशा सर्व ऊस उत्पादकांना समान पद्धतीने प्रतिटन ३ हजार ९५१ रुपये पहिला हप्ता देण्याचा निर्णय घेतला आहे.Someshwar’s



त्यामुळे एफआरपीच्या तुलनेत शेतकऱ्यांना प्रतिटन ४८४ रुपये अधिक मिळणार आहेत. दरम्यान, दुष्काळी परिस्थिती आणि ऊस उत्पादकांसमोरील अडचणी लक्षात घेऊन कारखान्याने विविध प्रोत्साहन अनुदानांची घोषणाही केली आहे. मागील हंगामात १६ फेब्रुवारीनंतर राखलेल्या आणि यंदा गाळपासाठी येणाऱ्या खोडवा उसाला प्रतिटन १०० रुपये, हार्वेस्टरद्वारे तोडणी झालेल्या उसाला ५० रुपये अनुदान दिले जाणार आहे. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये गाळपासाठी येणाऱ्या उसाला अनुक्रमे १००, १५० आणि २०० रुपये प्रतिटन अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. पुढील २०२७-२८ हंगामात गाळपासाठी येणाऱ्या खोडवा उसाला प्रतिटन २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे.bवीजनिर्मिती आणि उपपदार्थ निर्मितीतही कारखान्याने समाधानकारक कामगिरी केली आहे. सहवीज निर्मिती प्रकल्पातून २ कोटी ९२ लाख ९४ हजार ७९३ युनिट वीज तयार करण्यात आली असून, त्यापैकी १ कोटी ८१ लाख १८ हजार २०० युनिट वीज विक्री करण्यात आली आहे. डिस्टिलरी प्रकल्पातून १३ लाख ९६ हजार ७७० लिटर अल्कोहोल आणि ९ लाख २२ हजार १७२ लिटर इथेनॉलचे उत्पादन घेण्यात आले आहे.

सॉफ्ट लोन मधून कारखान्याला ४५ कोटी….

दरम्यान, एफआरपीची रक्कम अदा करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून कारखान्याला ४५ कोटी रुपयांचे सॉफ्ट लोन मंजूर झाल्याची माहिती अध्यक्ष शिंदे यांनी दिली. तसेच साखरेचे मूल्यांकन प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपयांवरून ४ हजार ७०० रुपये करण्यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. सभासद शेतकऱ्यांना आगामी काळातही समाधानकारक ऊसदर देण्याचा संचालक मंडळाचा प्रयत्न राहणार असून, सभासद आणि बिगरसभासदांनी आपला ऊस इतर कारखान्यांना न घालता सोमेश्वर कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन अध्यक्ष राजवर्धन शिंदे, उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाने केले आहे.

Someshwar’s first installment announced at ₹3,951 ₹484 per tonne above the FRP

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात