विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काश्मीर आता स्थानिक पातळीवर भरती करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपासून पूर्णपणे मुक्त झाला असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केली. नवी दिल्ली येथे आयोजित दहशतवादविरोधी परिषदेत बोलताना त्यांनी देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत केंद्र सरकारची आक्रमक भूमिका मांडली. देशातून दहशतवाद, संघटित गुन्हेगारी आणि अमली पदार्थांचे जाळे मुळापासून नष्ट करण्याचा निर्धार व्यक्त करत, जे गुन्हेगार परदेशात पळून गेले आहेत त्यांना भारतात परत आणणे अत्यंत गरजेचे असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. केंद्र सरकारने 2019 पासून आतापर्यंत 36 देशांमधून 303 फरार आरोपींना भारतात परत आणण्यात यश मिळवले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
दहशतवादी निधीपुरवठा नेटवर्क उद्ध्वस्त करणार; देशभरात एकसमान रणनीती
दहशतवादाविरोधातील लढा अधिक तीव्र करण्यासाठी संपूर्ण दहशतवादी निधीपुरवठा नेटवर्क (टेरर फंडिंग) तोडण्यावर विशेष भर दिला जात असल्याचे अमित शहा यांनी सांगितले. यासाठी आर्थिक तपास यंत्रणांमध्ये अधिक चांगला समन्वय निर्माण केला जात आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि द्वारकेपासून कामाख्येपर्यंत देशातील प्रत्येक पोलीस ठाण्यापर्यंत दहशतवादाचा सामना करण्यासाठी एकसमान रणनीती लागू केली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. याशिवाय, 11 राज्यांच्या पोलिसांनी केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून एकाच रात्रीत पीएफआय (PFI) नेटवर्कला मोठा धक्का दिला असून, ही मोहीम संपूर्ण जगासाठी एक ‘केस स्टडी’ ठरली असल्याचे शहा म्हणाले.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
कुलगाम चकमकीत लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी ठार; आत्मसमर्पणास दिला होता नकार
दरम्यान, बुधवारी काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दलांनी मोठी कारवाई करत लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी मोहम्मद लतीफ भट याचा खात्मा केला. लतीफवर ₹15 लाखांचे बक्षीस होते आणि 11 नोव्हेंबर रोजी नौपोरा अखरान येथील सीआरपीएफ चौकीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तो वॉन्टेड होता; या हल्ल्यात तीन जवान जखमी झाले होते. यापूर्वी 16 नोव्हेंबर रोजी लारू भागात झालेल्या चकमकीत त्याचा साथीदार उमर निसार डार ठार झाला होता, तर पायाला गोळी लागलेला लतीफ पळून जाण्यात यशस्वी झाला होता. दोन दिवसांनंतर देवसर भागातील जांगलपोरा गावातील एका मशिदीत तो लपल्याची माहिती मिळाल्यावर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. चकमकीपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला व्हिडिओ कॉल करून आत्मसमर्पण करण्याची संधी दिली होती; मात्र मला शरणागती पत्करायची नाही असे उत्तर दिल्यानंतर झालेल्या चकमकीत लतीफ ठार झाला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App