विशेष प्रतिनिधी
नाशिक: नाशिकमधील बहुचर्चित टीसीएस (TCS) धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणात सहआरोपी करण्यात आलेले एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांना अखेर न्यायालयाकडून मोठा कायदेशीर दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (19 नोव्हेंबर) जलील यांना ₹50,000 च्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान हिच्या फरार काळात तिला छत्रपती संभाजीनगर येथे आश्रय देण्यास मदत केल्याचा गंभीर आरोप इम्तियाज जलील यांच्यावर ठेवण्यात आला होता.
जामीनपात्र कलमांमुळे जलील यांचा जामिनाचा मार्ग मोकळा
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार, इम्तियाज जलील गुरुवारी स्वतः न्यायालयासमोर हजर झाले आणि त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज सादर केला. दुसरीकडे, सरकारी पक्षाच्या वकिलांनी जलील यांच्या जामीन अर्जाला जोरदार विरोध दर्शवला; मात्र इम्तियाज जलील यांच्यावर लावण्यात आलेली कलमे जामीनपात्र असल्याने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ₹50,000 च्या जातमुचलक्यावर त्यांचा जामीन मंजूर केला. काही दिवसांपूर्वी या प्रकरणात सहआरोपी म्हणून नाव आल्याने जलील यांच्या अडचणी वाढल्या होत्या, परंतु न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गडचिरोलीत ‘जनजातीय गौरव दिवसा’चा भव्य सोहळा; गडचिरोली 100 टक्के नक्षलमुक्त होऊन ‘स्टील सिटी’ म्हणून पुढे येत आहे: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
फरार आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याचे प्रकरण
नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक छळ प्रकरणाने संपूर्ण राज्यात मोठी खळबळ उडवली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी निदा खान तब्बल 2 महिने पोलिसांना गुंगारा देत फरार होती. या फरार काळात तिला छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याने लपवून ठेवल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. मतीन पटेल याने नेमके कोणाच्या सांगण्यावरून निदा खान हिला आश्रय दिला, याचा नाशिक पोलिसांनी सखोल तपास केला असता पोलिसांच्या हाती महत्त्वाचे तांत्रिक व ठोस पुरावे लागले. त्यातून निदा खान हिला लपवण्यासाठी आणि सर्व प्रकारचे सहकार्य करण्यासाठी इम्तियाज जलील, मतीन पटेल आणि इतरांनी मदत केल्याचे समोर आल्याने पोलिसांनी त्यांना या प्रकरणात सहआरोपी केले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App