तरुणांना संधी द्या म्हटलं की तुम्ही गडकरी निवृत्त होणार अशा खोट्या बातम्या छापता; नितीन गडकरींचा मिश्किल टोला

Nitin Gadkari

विशेष प्रतिनिधी

नागपूर: केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या काही जुन्या विधानांमुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीच्या चर्चांना अनेकदा उधाण येत असते. मात्र, नागपुरात एका कार्यक्रमात बोलताना गडकरी यांनी या सर्व चर्चांवर आपल्या खास मिश्किल शैलीत भाष्य केले आहे. मी जेव्हा पाण्यावर काम सुरू केले, त्याला आता 26 वर्षे झाली असून माझे वय वाढले आहे; त्यामुळे मी केवळ तरुण लोकांना पुढे आणा असे म्हणतो, पण तुम्ही माध्यमे गडकरी निवृत्त होणार अशा खोट्या बातम्या छापता, असा मिश्किल टोला गडकरी यांनी लगावला. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये एकच हशा पिकला. या वेळी त्यांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञानाचे हस्तांतरण होणे आवश्यक असून गाव, गरीब, मजूर आणि शेतकऱ्यांच्या हिताचे हे काम आपण आणि माध्यमे असेच पुढे नेत राहू, असे स्पष्ट केले. Nitin Gadkari

27 ते 30 नोव्हेंबरदरम्यान नागपुरात 17 वे ‘अॅग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शन

विदर्भातील शेतीचा विकास, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी येत्या 27 ते 30 नोव्हेंबर दरम्यान नागपुरात मध्य भारतातील सर्वात मोठे 17 वे ‘अॅग्रो व्हिजन’ कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनाद्वारे विदर्भातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, कृषी मार्गदर्शन आणि पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्याचे नवे मार्ग उपलब्ध करून दिले जाणार आहेत, अशी माहिती नितीन गडकरी यांनी दिली. इतकी वर्षे सरकार काम करत असतानाही दुष्काळाची परिस्थिती निर्माण होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. यावर उपाय म्हणून नागपूर जिल्ह्यातील कोळसा काढल्यानंतर रिकाम्या राहिलेल्या खाणींमध्ये साचलेले पाणी सोलर पंप लावून शेतकऱ्यांना दिले जाईल, तसेच भंडारा जिल्ह्यातील हजारो मालगुजारी अर्थात ‘मामा तलावांमधील’ गाळ काढला जाईल, असे गडकरी यांनी जाहीर केले.



विदर्भातील जलसंधारणाचे यशस्वी प्रयोग आणि बिहारमध्येही ‘जलसंजीवनी’

विदर्भात राबवण्यात आलेले जलसंधारणाचे विविध यशस्वी प्रयोग आता व्यापक स्तरावर जनतेसमोर आणले जात आहेत. यामध्ये वर्ध्याचा ‘तामसवाडा पॅटर्न’, रामटेकचा ‘तारपत्री बंधारा पॅटर्न’ आणि तलाव निर्मितीचा ‘बुलढाणा पॅटर्न’ यांचा समावेश असून, यामुळे अनेक भागांतील पाण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. धावणाऱ्या पाण्याला चालायला शिकवा, चालणाऱ्या पाण्याला थांबायला शिकवा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीत मुरायला लावा या प्रभावी मंत्रावर आधारित हा कार्यक्रम विदर्भातील प्रत्येक गावात राबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच धर्तीवर बिहारमधील पूर नियंत्रणासाठी नदी-नाल्यांचे खोलीकरण आणि ‘जलसंजीवनी अभियान’ राबवण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

‘मदर डेअरी’मुळे विदर्भातील दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी

गेल्या 17 वर्षांत अॅग्रो व्हिजनमुळे विदर्भात मोठा बदल घडल्याचे सांगताना गडकरी यांनी दुग्ध व्यवसायाचे उदाहरण दिले. पूर्वी माझी स्वतःची डेअरी बंद पडली होती, पण आता माझ्या घरी 100 लिटर दूध होते आणि हळूहळू प्रत्येक शेतकरी बदलत आहे, असे ते म्हणाले. विदर्भातील दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाच्या (NDDB) पुढाकाराने बुटीबोरी एमआयडीसीमध्ये तब्बल 850 कोटी रुपयांचा भव्य ‘मदर डेअरी’ प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे दूध संकलनात लक्षणीय वाढ होऊन उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे. याव्यतिरिक्त गोवंश सुधारणा कार्यक्रम आणि ‘एम्ब्रिओ ट्रान्सफर’ या आधुनिक तंत्रज्ञानामुळे भविष्यात देशी गाईंच्या दूध उत्पादनातही मोठी वाढ होणार असल्याचे गडकरी यांनी नमूद केले

Nitin Gadkari Reacts to Retirement Rumours, Takes a Dig at Media

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात