शासकीय योजनांतून आदिवासींचा संपूर्ण विकास साधणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

  • निमकुंड गावाच्या विकासाठी  ४ कोटी निधींची घोषणा
  •  पालकमंत्र्यांनी अशोक आठवले यांच्या घरी केला दिवाळीचा फराळ

अमरावती, : निमकुंडसह मेळघाटातील सर्व आदिवासी कुटुंबापर्यंत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१व्या जयंती निमित्त राबविण्यात येत असलेल्या सेवा सप्ताहात केंद्र व राज्य शासनाच्या सर्व योजनांचा लाभ पोचविण्यात येणार आहे.निमकुंड गावासाठी ३.४४ कोटी खर्चातून पिण्याच्या पाण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात येईल व ५० लाखांच्या निधीतून या गावात विविध विकास कामे राबविण्यात येतील असे प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज येथे केले.

या गावातील अशोक चिताराम आठवले यांच्या घरी पालकमंत्र्यांनी दिवाळीचा फराळ केला व शेतकऱ्यांसोबतच शासन आदिवासींच्या पाठीशीही खंबीरपणे उभे असल्याचा संदेश त्यांनी दिला.

अचलपूर तालुक्यातील दुर्गम व आदिवासी निमकुंड गावात पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी आदिवासी बांधवांसोबत दिवाळी साजरी करून गृहोपयोगी साहित्याचे वाटप केले आणि जिल्ह्यात ‘जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताहा’चा  शुभारंभ त्यांच्या हस्ते झाला.यावेळी आमदार सर्वश्री प्रवीण पोटे,केवलराम काळे, प्रवीण तायडे,अचलपूरच्या नगराध्यक्ष रुपाली माथने,निमकुंडच्या सरपंच रत्ना नागले, उपसरपंच अनिल अकोले,जिल्हाधिकारी आशिष येरेकर,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा धारणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला, पोलीस अधीक्षक निकेतन कदम आदी यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, क्रांतिसूर्य बिरसामुंडा यांनी त्याग, संघर्ष आणि स्वातंत्र्य लढ्यातील अतुलनीय योगदानातून आदिवासी समाजा समोर मोठा आदर्श निर्माण केला आहे. या समाजाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध कल्याणकारी योजना आखल्या आहेत.या योजनांचा लाभ प्रत्येक आदिवासी कुटुंबापर्यंत पोचविण्यासाठी राज्यशासन प्रयत्न करीत आहे.११ ते १८ नोव्हेंबर दरम्यान जनजातीय गौरव दिवस सेवा सप्ताह साजरा होत असून या सप्ताहात निमकुंडसह मेळघाटातील सर्व आदिवासी गावांमध्ये शासनाच्या सर्व योजना पोचविण्यात येतील असे त्यांनी सांगितले.

या गावात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल. सध्या गावात सुरू असलेली पाणी पुरवठा योजना अपुरी असल्याने नव्याने तयार करण्यात आलेल्या ३ कोटी ४४ लाख खर्चाच्या योजनेस मंजुरी देण्यात येणार, तसेच या गावासाठी अन्य विकास कामांसाठी ५० लाखांच्या निधीतून कामे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, गावचे उपसरपंच अनिल अकोले यांनी स्वागतपर भाषण केले. आमदार केवलराव काळे यांनी प्रास्ताविक केले तर आमदार प्रवीण पोटे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

आदिवासी बांधवाच्या घरात फराळ व गावकऱ्यांना फराळाचे वाटप

सर्वत्र दिवाळी सणाचा उत्साह असताना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांची निमकुंड आदिवासी गावाला भेट असल्याने त्यांनी समस्त गावकऱ्यांसाठी फराळ आणला व त्यांना प्रेमाने वाटप केले. त्यांच्या या प्रेमळ व आपुलकीच्या वागणुकीने गावकरी भावूक झाले होते. शासनातील मंत्री आपल्यासोबत दिवाळी साजरी करीत असल्याचा आनंद गावातील लहानग्यांपासून, महिला,पुरुष व ज्येष्ठ नागरिकांमध्ये दिसून आला. विविध शासकीय योजनांच्या लाभाचे वितरणही पालकमंत्र्यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमानंतर पालकमंत्री थेट गावातील अशोक चिताराम आठवले यांच्या घराकडे वळले. सडा सारवन, त्यावर सुरेख रांगोळी आणि कौलारू व आकर्षक रंगरंगोटी केलेल्या या मातीच्या छोट्याशा घरात आठवले कुटुंबीयांनी पालकमंत्र्यांना खास घरगुती फराळ दिला व चहापान केले. लोकप्रतिनिधी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी अशोक आठवले यांची आई जसाय, पत्नी सुनीता आणि मुलं अंश व आरोह यांची आस्थेने विचारपूस केली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या व  त्या सोडविण्यासाठी प्रशासनाला निर्देशही दिले.

Will achieve the holistic development of tribal communities through government schemes – Minister Chandrashekhar Bawankule

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात