आता दारू विक्रेत्यांची खैर नाही! तुकाराम मुंढेंचा मोर्चा भेसळ करणाऱ्यांकडे; तपासणीत 60 टक्के भेसळ आढळल्याचा दावा

Tukaram Mundhe

पनीर, दूध, दहीपासून न्युट्रास्युटिकल्सपर्यंत कारवाईनंतर आता दारूतील भेसळीवर FDAचा कडक वॉच; तुकाराम मुंढेंचा इशारा

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळखोरांविरोधातील कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. दूध, दही, पनीर, खाद्यपदार्थांपासून मोठ्या कंपन्यांपर्यंत कारवाई केल्यानंतर आता एफडीएचा मोर्चा न्युट्रास्युटिकल्स म्हणजेच प्रोटीन पावडर विक्रेते आणि दारूमध्ये भेसळ करणाऱ्यांकडे वळणार आहे. दारूच्या तपासणीदरम्यान तब्बल 60 टक्के भेसळ आढळून आल्याचा दावा तुकाराम मुंढे यांनी केला आहे. Tukaram Mundhe

राज्यात अन्नभेसळीविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी भूमिका तुकाराम मुंढे यांनी घेतली आहे. यापूर्वी पनीर, दूध, दही यांसह विविध खाद्यपदार्थांच्या भेसळीवर कारवाई करण्यात आली. मोठ्या औषध कंपन्यांवरही प्रशासनाने कारवाई केली आहे. तसेच चुकीच्या पद्धतीने उत्पादनांच्या जाहिराती करणाऱ्या काही बॉलिवूड कलाकारांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

दारूमध्ये 60 टक्के भेसळ?

अलीकडे दारूची तपासणी केली असता दारूमध्ये 60 टक्के भेसळ आढळून आल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे आता दारूमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दारूमध्ये भेसळ करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. काही दिवसांपूर्वी दारूमधील भेसळीमुळे काही जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही समोर आल्या होत्या. त्यामुळे या पार्श्वभूमीवर एफडीएच्या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

प्रोटीन पावडर विक्रेत्यांचीही तपासणी

दारूसोबतच न्युट्रास्युटिकल्स म्हणजेच प्रोटीन पावडर आणि इतर पूरक आहारांच्या विक्रीवरही एफडीएची नजर राहणार आहे. उत्पादनावरील लेबल, त्यातील घटक, उत्पादनाबाबत केले जाणारे दावे आणि विक्रीची पद्धत यांची तपासणी केली जाणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.



सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित अन्न मिळणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. अन्न सुरक्षा आणि त्यासंदर्भातील कायद्यांची कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘अन्नातील भेसळ सर्वाधिक घातक’

अन्नातील भेसळ ही सर्वाधिक घातक असल्याचे तुकाराम मुंढे यांनी नमूद केले. अन्न सुरक्षा कायदा 2006 आणि त्यासंदर्भातील नियम 2011 पासून अस्तित्वात असून त्याची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेशोत्सवाच्या काळात एफडीएकडून करण्यात आलेल्या कारवाईचा विषय धर्माशी जोडला गेल्याचेही त्यांनी नमूद केले. मात्र, प्रशासनाची कारवाई ही कोणत्याही धर्माविरोधात नसून नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळावे यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘घरात 90 टक्के पदार्थ एक्सपायरी डेटनंतरचे’

नागरिकांनी घरातील खाद्यपदार्थांकडेही लक्ष देण्याचे आवाहन करताना तुकाराम मुंढे यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. आपल्या घरातील फ्रीज तपासला तर मोठ्या प्रमाणात पदार्थ एक्सपायरी डेट उलटून गेलेले आढळतील, असे ते म्हणाले.

यामुळे केवळ बाहेरील विक्रेत्यांवर कारवाई करण्याबरोबरच नागरिकांनीही खाद्यपदार्थांच्या एक्सपायरी डेटकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

बदलीच्या चर्चेला मुंढेंचा पूर्णविराम

दरम्यान, तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली होणार असल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी त्यांची नियुक्ती होणार असल्याचीही चर्चा होती. मात्र, आपली कुठेही बदली होणार नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले होते.

भेसळखोरांविरोधात सुरू असलेल्या कारवाईमुळे नागरिकांकडून तुकाराम मुंढे यांच्या कामाचे कौतुक केले जात आहे. आता न्युट्रास्युटिकल्स आणि दारूमधील भेसळीविरोधात प्रशासनाने मोर्चा वळवल्याने संबंधित विक्रेत्यांमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे.

Liquor sellers are in for trouble! Tukaram Mundhe targets those involved in adulteration

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात