विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मुंबईत मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेत अनेक वर्षे काम केलेल्या आणि मुंबईच्या माजी महापौर राहिलेल्या विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. पालघरच्या जात पडताळणी समितीने कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवल्यानंतर विशाखा राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका आज बुधवारी (2 सप्टेंबर) उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे आता राऊत यांचे नगरसेवक पद जवळपास रद्द झाल्यात जमा आहे. ज्यामुळे आता हा ठाकरेंच्या शिवसेनेसाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेची मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या सुद्धा कमी होणार आहे. परंतु, यामुळे शिंदेंच्या शिवसेनेतील प्रिया सरवणकर या वॉर्ड क्रमांक 191 च्या नगरसेविका पदी विराजमान होतील. Vishakha Raut
विशाखा राऊत यांचे ओबीसी प्रमाणपत्र हे अवैध असल्याचा निर्णय पालघरच्या जात पडताळणी समितीने दिला होता. त्यानंतर विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचा निर्णय जाहीर करावा, असे पत्र मुंबई महापालिकेने राज्य सरकारला लिहिले होते. मात्र महापालिकेच्या या पत्रव्यवहारावर आक्षेप घेत विशाखा राऊत यांनी या निर्णयाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर आज बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. ज्यानंतर राऊत यांची याचिका याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद रद्द झाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर महापालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी 25 ऑगस्ट रोजी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पाठवलेले पत्र समोर आले आहे.
मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी 25 ऑगस्ट रोजी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना याबाबत पत्र पाठवले आहे. जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्याचा निर्णय 20 ऑगस्ट रोजी घेण्यात आला होता. त्यानंतर मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदीनुसार राऊत यांची नगरसेवक म्हणून झालेली निवड आपोआपच रद्द झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, नगरसेवक पद रद्द झाल्यामुळे पुढील सहा वर्षे नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास त्या अपात्र ठरल्याचेही महापालिका आयुक्तांनी पत्रातून स्पष्ट केले आहे. ही बाब महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्याची विनंती आयुक्तांनी केली आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App