राहुल गांधींच्या आंदोलनाला शरद पवारांचा छेद; राहुल गांधींचे लोककल्याण मार्गावर आंदोलन, तर शरद पवार अभिजीत दिपकेच्या भेटीला जंतर – मंतर वर!!

नाशिक : राहुल गांधींच्या आंदोलनाला आज शरद पवारांनी छेद दिला. राहुल गांधी हे काँग्रेसच्या खासदारांसह पंतप्रधानांचे निवासस्थानासमोर लोककल्याण मार्गावर आंदोलन करत असतानाच शरद पवार तिथे पोहोचले नाहीत, तर ते अभिजीत दिपके याच्या भेटीसाठी जंतर – मंतर वर पोहोचले. पवारांनी तिथे अभिजीत दिपके याच्याशी बातचीत केली‌. त्यामुळे माध्यमांच्या प्रसिद्धीचा फोकस विभागला गेला. Rahul Gandhi

  • CJP चे आंदोलन ताब्यात घेण्याची खेळी

संजय राऊत यांनी आज सकाळीच कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन विरोधी पक्षांनी ताब्यात घेतले पाहिजे, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या पाठोपाठ ममता बॅनर्जी यांनी कोलकत्यातून गरज पडल्यास आपण इथून उठून कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सामील होऊ, अशी घोषणा केली होती. त्यामुळे तृणमूळ काँग्रेस आणि शिवसेना हे दोन प्रादेशिक पक्ष कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन ताब्यात घेण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळे राहुल गांधींनी गनिमी कावा करत कॉकरोच जनता पार्टीचे आंदोलन वेगळ्या मार्गाने काँग्रेसच्या ताब्यात घेतले.

  • राहुल गांधींचा गनिमी कावा

राहुल गांधी आज मल्लिकार्जुन खर्गे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांच्या राजाजी मार्गावरच्या निवासस्थानी दुपारी पोहोचले‌. तिथे त्यांच्याबरोबर प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक खासदार खर्गे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात हजर राहिले. पण तिथेच त्यांनी पंतप्रधानांचे निवासस्थान असलेल्या लोककल्याण मार्गावर जाऊन आंदोलन करायचा निर्णय घेतला. राहुल गांधी प्रियंका गांधी मल्लिकार्जुन खर्गे आणि अनेक नेते राजाजी मार्गावरून थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या समोर पोहोचले. त्यांनी तिथे अचानक आंदोलन सुरू केले. राहुल गांधींची आंदोलनाची योजना दिल्ली पोलिसांच्याही लक्षात आली नाही. राहुल गांधी यांच्यासारखे आणि मल्लिकार्जुन खरेदी यांच्यासारखे “व्हीव्हीआयपी” लोककल्याण मार्गावर आल्याने दिल्ली पोलिसांची धावपळ उडाली. पण तोपर्यंत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, प्रियांका गांधी आणि काँग्रेसचे अनेक खासदार आणि अनेक माजी मुख्यमंत्री लोककल्याण मार्गावर जमले आणि त्यांनी जोरदार आंदोलन सुरू केले. त्यामुळे माध्यमांच्या प्रसिद्धीचा सगळा फोकस जंतर-मंतर वरून थेट लोककल्याण मार्गावर आला.



  • जितेंद्र सिंह – राहुल गांधी चर्चा

मोदी सरकारला सुद्धा राहुल गांधींच्या आंदोलनाची लगेच दखल घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांना राहुल गांधींच्या भेटीसाठी पाठविले. जितेंद्र सिंह आणि राहुल गांधी यांच्या सुमारे 15 ते 20 मिनिटे बातचीत झाली, पण राहुल गांधींनी आंदोलन थांबवायला नकार दिला. त्यामुळे जितेंद्र सिंह तिथून निघून गेले.

  • शरद पवारांची खेळी

याच दरम्यान शरद पवारांनी एक वेगळीच खेळी केली. ते राहुल गांधींच्या बरोबर लोककल्याण मार्गावर गेले नाहीत. त्यांनी सुप्रिया सुळे यांना बरोबर घेऊन जंतर-मंतर गाठले‌. तिथे त्यांनी अभिजीत दिपके याची भेट घेतली त्याच्याशी बातचीत केली. अभिजीत दिपके याने कॉकरोच जनता पार्टीच्या सगळ्या मागण्या शरद पवारांच्या कानावर घातल्या. त्यामुळे माध्यमांच्या प्रसिद्धीचा फोकस विभागला गेला. निदान मराठी माध्यमे तरी शरद पवारांच्या मागे गेली. त्यांनी शरद पवारांचा आणि अभिजीत दिपके याचा बाईट घेतला.

  • राहुल गांधींच्या आंदोलनाला पवारांचा छेद

एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन काँग्रेस ताब्यात घेत असताना दुसरीकडे शरद पवारांनी मात्र कॉक्रोच जनता पार्टीचा मुख्य नेता अभिजीत दिपके याची भेट घेऊन राहुल गांधींच्या आंदोलनाला राजकीय छेद दिला. यातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अपेक्षित असलेलेच राहुल गांधींना राजकीय पाऊल करण्याचे काम केले.

Sharad Pawar undermines Rahul Gandhi’s agitation.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात