वृत्तसंस्था
नवी दिल्ली : विद्यार्थ्यांचे आंदोलन शांतपणे सुरू होते, पण पोलिसांनीच त्यांच्यावर लाठीमार केला, असा दावा सोनम वांगचूक याने हॉस्पिटलमध्ये बसून केला. त्याचबरोबर त्याने उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
– सोनम वांगचूकचे ट्विट
समाजसेवक सोनम वांगचुक यांनी ट्विट केले, की “शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या तरुणांशी ज्या क्रूरतेने वागले जात आहे, ते पाहता मी माझे उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत युवा नेत्यांना संसद भवनात जाऊन खासदारांना भेटण्याची किंवा मला त्यांना येथे रुग्णालयात भेटण्याची परवानगी मिळत नाही, तोपर्यंत हे उपोषण चालू राहील. त्याआधी सरकार शिक्षण मंत्र्यांची जबाबदारी निश्चित करेल, अशी मला आशा आहे. मी सरकार आणि पोलीस दलाला आवाहन करतो की, विद्यार्थ्यांनी आपली गाऱ्हाणी आज किंवा उद्या संसदेसमोर मांडण्याची परवानगी देऊन हा प्रश्न सोडवावा. मला खात्री आहे की, आज ज्याप्रमाणे संयम आणि सहनशीलता दाखवली, तशीच ती हे तरुण आंदोलक उद्याही दाखवतील.”
#WATCH | Delhi: Stone pelting seen at Delhi’s Connaught Place. (Source: Delhi Police)#CJPProtest pic.twitter.com/Bo2lU1rP23 — ANI (@ANI) July 20, 2026
#WATCH | Delhi: Stone pelting seen at Delhi’s Connaught Place.
(Source: Delhi Police)#CJPProtest pic.twitter.com/Bo2lU1rP23
— ANI (@ANI) July 20, 2026
– दिल्लीत दगडफेक
मात्र एकीकडे सोनम वांगचूक याने शांततापूर्ण आंदोलनाचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात दिल्लीमध्ये आज सायंकाळी आंदोलनाच्या नावाखाली अनेकांनी ठिकठिकाणी दगडफेक केली. आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला. आंदोलकांनी सुरुवातीला फिरोजशहा मार्गावर उतरून दगडफेक केली. त्यानंतर दिल्लीच्या कॅनॉट प्लेस भागात सुद्धा जाऊन दगडफेक केली. त्यामुळे सोनम वांगचूक याचा शांततापूर्ण आंदोलनाचा दावा फोल ठरला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App