कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांचा दुहेरी “डाव”; एकीकडे आरोग्य मंत्री नड्डांशी चर्चा, दुसरीकडे पोलिसांवर दगडफेक!!

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलकांनी आज दुहेरी “डाव” खेळला. एकीकडे त्यांनी आपले प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी चर्चा करायला पाठविले, तर दुसरीकडे आंदोलकांनी संसद भवनाच्या रस्त्यावर वेगवेगळ्या मार्गांनी जाऊन मोठा गदारोळ केला. आंदोलकांनी फिरोजशहा मार्गावर पोलिसांवर दगडफेक केली. त्यामध्ये अनेक पोलीस जखमी झाले. Cockroach Janata Party

– जे. पी. नड्डांशी चर्चा

आंदोलकांशी चर्चा केल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी ट्विट केले आहे की, “आज सकाळी पहिल्यांदाच आंदोलकांकडून सरकारशी चर्चा करण्याचा प्रस्ताव आला आणि सकाळी ११:५० पासून आमची चर्चा सुरू आहे. ही बैठक सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली. त्यांच्या शिष्टमंडळासोबत सविस्तर प्राथमिक तोंडी चर्चा झाली आणि त्यांनी सायंकाळी ४ च्या सुमारास मला लेखी निवेदन सादर केले. मी सर्व आंदोलकांना त्यांचे धरणे आंदोलन मागे घेण्याची आणि जनजीवन पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची विनंती केली आहे.”

– आंदोलकांची रस्त्यावर हुल्लडबाजी

मात्र, याच दरम्यान पोलिसांनी अभिजीत दिपके याला ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलकांनी दिल्लीतल्या रस्त्यांवर हुल्लडबाजी केली. त्यामुळे मध्य दिल्ली परिसरात सायंकाळी वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. आंदोलकांनी रस्त्यांवर छय्या छय्या असली गाणी म्हणून अनेक मुलींनी अश्लील नृत्य केले. यात आंदोलनापेक्षा हुल्लडबाजीचा प्रकार मोठा होता. बाई आंदोलकांनी फिरोजशहा मार्गावर पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या आणि आणि अश्रुधूर सोडल्याच्या बातम्या आल्या. कारण आंदोलकांनी संसद भवन परिसरात घुसून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी सुरक्षारक्षकांनी संसदेची सगळी द्वारे बंद करून सुरक्षा व्यवस्था मजबूत ठेवली. त्यामुळे आंदोलन संसद भवनात घुसू शकले नव्हते. त्यामुळे आंदोलकांनी दिल्लीच्या वेगवेगळ्या रस्त्यांवर हुल्लडबाजी करून पोलिसी बंदोबस्ताचा वचपा काढला. आंदोलकांच्या दगडफेकी मध्ये अनेक पोलीस जखमी झाले त्यांना वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करावे लागले.

The double “plot” of the Cockroach Janata Party protesters

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात