कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space; विरोधकांचे आंदोलनही विस्कळीत!!

नाशिक : कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने खाल्ली विरोधकांची अख्खी political space सगळ्या विरोधकांचे आंदोलन सुद्धा विस्कळीत!! हेच राजकीय वास्तव आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी समोर आले.

– शबाना आजमी, चंद्रशेखर आजाद आंदोलनात

कॉकरोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जंतर-मंतरवर जे आंदोलन केले त्याच्यावर पोलिसांनी सौम्य लाठीमार केला त्यामुळे प्रसिद्धीचा सगळा फोकस जंतर-मंतरवर आला. कॉकरोच जनता पार्टीच्या सदस्यांनी सरकारशी चर्चा करायची तयारी दाखवल्यानंतर त्यांचे प्रतिनिधी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्या भेटीला पोहोचले. पण याच दरम्यान जंतर – मंतरवर मोठे राजकीय नाट्य रंगले होते. तिथे पोलिसांनी सौम्य लाठीमार केलाच होता तिथे शबाना आजमी, चंद्रशेखर आजाद वगैरे लिबरल लोक विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचले.

– फक्त समाजवादी पार्टीच्या खासदारांचा मोर्चा

संसदेच्या अधिवेशनात सुद्धा या आंदोलनाचे पडसाद उमटले. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी विशेष उल्लेखाद्वारे राज्यसभेत तो मुद्दा उपस्थित केला त्यांनी मोदी सरकारवर जोरदार शरसंधान साधले. याच दरम्यान समाजवादी पार्टीच्या खासदारांनी डिंपल यादव यांच्या नेतृत्वाखाली संसदेपासून जंतर-मंतर पर्यंत मोर्चा काढला. त्यामध्ये समाजवादी पार्टीचे सगळे खासदार सामील झाले, पण काँग्रेस किंवा अन्य पक्षांचे कुठले खासदार त्या मोर्चामध्ये सामील झाल्याचे दिसले नाही. सुप्रिया सुळे यांनी फक्त ट्विटर हँडलवर लाठीमाराचा फोटो शेअर करून सरकारचा निषेध केला काँग्रेसच्या खासदारांनी आणि नेत्यांनी माध्यमांना बाईट देऊन मोदी सरकारचा निषेध केला.

– फारूक अब्दुल्लांचे आंदोलन दुर्लक्षित

पण याच कालावधीमध्ये जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून आंदोलन केले, पण त्या आंदोलनाकडे विरोधकांचे लक्ष सुद्धा गेले नाही. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाकडे प्रसिद्धीचा सगळा फोकस राहिला. त्यामुळे सगळे विरोधक त्या पार्टीच्या आंदोलनाच्या भोवती फोटो अपॉर्च्युनिटी साठी जमले. पण एकेकाळी जम्मू – काश्मीरवर पूर्ण कब्जा करून राज्य करणाऱ्या फारूक अब्दुल्ला यांच्या आंदोलनाकडे विरोधकांनी साधे लक्ष सुद्धा दिले नाही. कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनामुळे राम मंदिरातल्या देणगीचा चोरीचा मुद्दा सुद्धा झाकोळला गेला. संसदेत विरोधकांनी फक्त गोंधळ घातला. त्यामुळे तीन वेळा कामकाज तहकूब करावे लागले, पण दरम्यानच्या काळात सरकारने स्वतःला अपेक्षित असलेली तीन विधेयके लोकसभा आणि राज्यसभेत मांडून घेतली.

– विरोधक विस्कळीत

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात मोदी सरकारला घेरण्यासाठी विरोधकांनी मुद्दे तर भरपूर काढून ठेवले होते, पण कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने अधिवेशनाच्या पहिल्याच विरोधकांची सगळी political space खाल्ली. विरोधकांचे आंदोलन सुद्धा विस्कळीत झाले. मोदी सरकारला एकच एक मुद्दा लावून धरून एकजुटीने जेरीस आणण्याचा विरोधकांचा प्रयत्न संसदेच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी फसला.

Samajwadi Party MP Dimple Yadav, along with party MPs, marches from Parliament to Jantar Mantar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात