बंगाल, तामिळनाडू, केरळमध्ये प्रादेशिक घराणेशाहीला दणका; राष्ट्रीय पक्षांना फायदा!!

Regional dynasticism

नाशिक : प्रादेशिक घराणेशाहीला दणका; राष्ट्रीय पक्षांना फायदा!!, हेच राजकीय चित्र पश्चिम बंगाल, तामिळनाडू, आसाम, केरळ आणि पांडिचेरी या राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल मधून समोर आले.Regional dynasticism suffers blow in Bengal, Tamil Nadu, Kerala; National parties benefit!!

पश्चिम बंगाल मध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप सत्तेवर येणार, तामिळनाडू एम के स्टालिन यांच्या द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाला हरवून अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम आणि भाजप यांची युती सत्तेवर येणार, तर केरळमध्ये काँग्रेस प्रणित युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटला हरवून सत्तेवर येणार, असा निष्कर्ष विविध एक्झिट पोलनी काढला आहे. आसाम पुन्हा एकदा भाजपच्या पारड्यात जाणार, तर पांडिचेरी मध्ये सुद्धा सत्ताधारी पक्षच पुन्हा सत्तेवर येणार, असाही निष्कर्ष एक्झिट पोलने काढला आहे.



 

– प्रादेशिक घराणेशाहीला दणका

या सगळ्याचा निष्कर्ष हाच की पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांच्या मतदारांनी प्रादेशिक पक्षांच्या घराणेशाहीला मोठा धक्का दिला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आपला भाचा अभिषेक बॅनर्जी याचे घोडे पुढे दामटवू पाहत होत्या. परंतु, त्यांना पश्चिम बंगालच्या मतदारांनी दणका दिला, तर तामिळनाडूमध्ये एम. के. स्टालिन हे आपला मुलगा उदयनिधी स्टालिन याचे घोडे पुढे दामटवू पाहत होते, त्यांना तामिळनाडूतल्या मतदारांनी दणका दिला. ममता बॅनर्जी आणि एम. के‌. स्टालिन या दोघांनीही आपल्या राज्यांमध्ये हिंदू जनतेचा अपमान करणारी वक्तव्ये केली. विशेषतः तामिळनाडूमध्ये स्टालिन पिता – पुत्रांनी सनातन धर्माला शिव्या देण्याचा अतिरेक केला. त्याचे पडसाद मतदानात उमटल्याचे चित्र एक्झिट पोल मधून समोर आले.

– बांगलादेशी घुसखोरच ममतांना नडले

ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेस पूर्णपणे बांगलादेशी घुसखोर मतदारांवर अवलंबून ठेवली. मूळ बंगाली हिंदू मतदारांकडे त्यांनी पूर्ण दुर्लक्ष केले. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम या स्वरूपाची निवडणूक झाली. त्याचे पडसाद मतदानात उमटल्यामुळे ममता बॅनर्जींच्या पंधरा वर्षांच्या राजवटीला पराभव पत्करावा लागला, असा निष्कर्ष अनेक एक्झिट पोलनी काढला.

– केरळमध्ये काँग्रेसकडून कम्युनिस्ट हरले

केरळमध्ये कम्युनिस्ट प्रणित लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंटने केलेल्या भ्रष्टाचाराचा त्यांना फटका बसला. तिथे काँग्रेसमध्ये प्रचंड मतभेद असून सुद्धा सरकार विरोधात मोठे जनमत असल्याने कम्युनिस्टांना काँग्रेसमधल्या मतभेदांचा फायदा उचलता आला नाही.

– हेमंत विश्वशर्मांची काँग्रेसवर मात

आसाम मध्ये मुख्यमंत्री हेमंत विश्वशर्मा यांच्या विरोधात काँग्रेसने वैयक्तिक बदनामीकारक प्रचार केला, तो काँग्रेसवरच उलटला. काँग्रेसला गौरव गोगोई यांचे नेतृत्व तिथे प्रस्थापित करता आले नाही. गौरव गोगोईंच्या ब्रिटिश पत्नीच्या पाकिस्तानी हेरगिरीचा मुद्दा त्यांच्यावर उलटला. आसाम मध्ये काँग्रेस घुसखोर बांगलादेशी श्रीमान वरच अवलंबून राहिली त्याचाही फटका पक्षाला बसला.

पाचही राज्यांच्या निवडणुकीमध्ये प्रादेशिक घराणेशाहीची दादागिरी चालविणाऱ्या पक्षांना दणका बसला. पण भाजप आणि काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा फायदा झाला, असाच निष्कर्ष एक्झिट पोलने काढला.

Regional dynasticism suffers blow in Bengal, Tamil Nadu, Kerala; National parties benefit!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात