पंतप्रधान मोदींची महाराष्ट्राला भेट; काशी आणि अयोध्येचा वाढविला रेल्वे कनेक्ट!!

वृत्तसंस्था

काशी : पंतप्रधान नरेंद्र मोदींची महाराष्ट्राला भेट; काशी आणि अयोध्येचा वाढविला रेल्वेने!!, ही घटना आज काशीमध्ये घडली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ काशी मध्ये आयोजित केलेल्या महिला संमेलनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी दोन अमृत भारत एक्सप्रेसना हिरवा झेंडा दाखविला. त्यामुळे महाराष्ट्र आणि काशी – अयोध्या यांचा नवा रेल्वे कनेक्ट खुला झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काशी ते पुणे आणि मुंबई ते अयोध्या अशा या दोन अमृत भारत एक्सप्रेस आज पासून सुरू करून दिल्या. त्यामुळे महाराष्ट्रातून काशी आणि अयोध्या या दोन तीर्थस्थळांना थेट पोहोचण्यासाठी भाविकांना एक अत्याधुनिक पर्याय उपलब्ध झाला.



मुंबईतून अयोध्येसाठी कुर्ल्याच्या लोकमान्य टिळक टर्मिनस वरून अमृत भारत एक्सप्रेस सुटेल आणि ती पुन्हा तिथेच येईल. त्याचबरोबर पुण्याच्या हडपसर मधून काशीसाठी अमृत भारत एक्सप्रेस सुटेल आणि ती पुन्हा तिथेच येईल. या दोन महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांच्या उद्घाटनांमुळे महाराष्ट्रातल्या भाविकांना अयोध्या आणि काशी तीर्थस्थळांच्या यात्रा अधिक सोप्या आणि सुकर होतील, अशा शुभेच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या.

Prime Minister Modi Visits Maharashtra; Boosts Rail Connectivity to Kashi and Ayodhya!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात