विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महामेट्रो पुणे प्रकल्पाच्या मेट्रो भवनाचे उदघाटन संपन्न झाले. या इमारतीच्या रूपाने पुणे मेट्रोला स्वतःचे हक्काचे घर आणि अत्याधुनिक नियंत्रण केंद्र प्राप्त झाले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री यांनी यावेळी केले. Metro Bhavan
पुणे मेट्रोच्या कामाची गती ही देशातील सर्वाधिक वेगवान मेट्रो कामांपैकी एक आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री यांनी मेट्रो टीमचे कौतुक केले. मेट्रो भवन हे केवळ एक कार्यालय नसून, मेट्रोच्या स्वयंचलित सिग्नलिंग, कमांड अँड कंट्रोल आणि आपत्ती व्यवस्थापनाचे हृदय आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभ प्रवासासाठी अशा प्रकारच्या सुसज्ज इमारतीची नितांत गरज होती, जी आज पूर्ण झाली आहे.
– प्रवाशांची संख्या अडीच लाख पार
पुणेकरांनी मेट्रोचा उदंड प्रतिसाद दिला असून, दैनंदिन प्रवाशांची संख्या 2.5 लाखांच्या पार गेली आहे. विशेषतः गणेशोत्सवात एकाच दिवशी पावणे सहा लाख प्रवाशांनी प्रवास करून विक्रम प्रस्थापित केला. हा ओघ पाहता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या जाळ्याचा विस्तार 200 किलोमीटरपर्यंत नेण्याचे महत्त्वाकांक्षी नियोजन जाहीर केले. यामध्ये पुणे महानगरपालिका, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्राचे पूर्णपणे एकत्रीकरण (Integration) केले जाणार आहे. मेट्रोच्या कामाची गती 5 वर्षांवरून 3 वर्षांवर आणण्याचे जागतिक निकष गाठण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे शहर आता ‘ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स’ (GCC) चे केंद्र बनत आहे. महाराष्ट्र हे जीसीसी धोरण आखणारे देशातील पहिले राज्य ठरले असून, पुण्याने या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे.
यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भिमराव तापकीर, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App