Karuna Sharma : मुंडेंना अजूनही सरकारी बंगला सोडवेना, करुणा शर्मांनी काय ऑफर दिली?

Karuna Sharma

मुंबई : धनंजय मुंडे यांनी आपल्या अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पाच महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. मात्र असे असूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (अजित पवार) नेते धनंजय मुंडे यांनी ‘सातपुडा’ हे शासकीय निवासस्थान अजूनही रिकामं केलेलं नाही. Karuna Sharma



माझ्या मुलीची शाळा असल्यामुळे आणि माझी तब्येत खराब असल्यामुळे मी बंगला अद्याप सोडला नसल्याच कारण त्यांनी दिलं होत. मुंबईत आपल्याकडे घर नसल्याने शासकीय निवास्थान सोडण्याची मुदत त्यांनी वाढवून मागितली होती. मात्र आता मुंडेंच्या नावावर मुंबईमध्येच एक आलिशान घर असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंडेंच्या नावावर गिरगांव चौपाटी येथील एन एस पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत घर असल्याचं समोर आलंय.

विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडेंनी संबंधित घराचा उल्लेख केलेला आहे. वीरभवन नावाच्या २२ मजली इमारतीत ९ व्या मजल्यावर ९०२ क्रमांकाच घर मुंडेंच्या नावावर असल्याचं समजतंय. हे घर एकूण २ हजार १५१ चौरस फुटांच असल्याचं समोर येतंय. या सगळ्या नंतर धनंजय मुंडे आता शासकीय निवासस्थान कधी सोडणार यावर चर्चा सुरु असतांनाच करुणा शर्मा मुंडे यांनी मोठे वक्तव्य केले आहे. Karuna Sharma

करुणा मुंडेंची धनंजय मुंडेंना कसली ऑफर?

धनंजय मुंडे यांचे मुंबईत तीन ते चार घरं आहेत, असा धक्कादायक खुलासा करुणा मुंडेंनी केला आहे. मुंडेंची पवई, मलबार हिल आणि सांताक्रूझमध्येही घरं असल्याचा दावा त्यांनी केला आहे. धनंजय मुंडेंना जर राहायला घर नसेल तर त्यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीसोबत माझ्या घरी यावं. मी त्यांना माझ्या घरात घेईल, असं त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेंसाठी ४२ लाखांचा दंड हा काहीच नाहीये, असंही त्या म्हणाल्या. इतकंच नाही तर धनंजय मुंडे पुन्हा कधीही मंत्री होणार नाहीत, याउलट त्यांना त्यांचे आमदारकी पदही गमवावं लागेल, असा खळबळजनक दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

दमानिया सरकारला नोटीस पाठवणार?

पुढच्या ४८ तासांत मुंडेंनी घर खाली करून दंड भरावा अन्यथा सरकारला लीगल नोटीस पाठवण्याचं अंजली दमानिया यांनी म्हटल आहे. धनंजय मुंडेंनी जेव्हा माझं मुंबईत घर नाही आणि मुलीच्या शिक्षणामुळे तसचं माझ्या तब्येतीमुळे मला घर सोडता येणार नसल्यचं सांगितलं होतं. तेव्हाच आपण त्यांना घर भाड्याने घेऊन रहा असं म्हटलं होत. परंतु आता त्यांनी कायद्याप्रमाणे सातपुडा बंगला खाली करणं भाग आहे, असं दमानिया म्हणाल्या. Karuna Sharma

आम्ही आज सरकारला एक लीगल नोटीस पाठवणार आहे. जर मुंडे ४८ तासांत तो बंगला रिकामा करत नसतील आणि ४६ लाखांचा थकबाकी असलेला दंड भरत नसतील तर आम्ही सरकारला प्रश्न करू, असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला आहे.

Munde still hasn’t left the government bungalow, what offer did Karuna Sharma make?

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात