जाणून घ्या, नेमका काय करण्यात आला आहे विराटवर आरोप आणि कुणी केली आहे तक्रार? Virat Kohli
विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी आता विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. आयपीएल २०२५ ट्रॉफी जिंकल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने ४ जून रोजी एक विजयी रॅली आयोजित केली होती, त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी झाली आणि ११ जणांचा मृत्यू झाला. तर ५० हून अधिक लोक जखमी झाले. आता या प्रकरणाबाबत विराट कोहलीविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. Virat Kohli
सामाजिक कार्यकर्ते एच.एम. वेंकटेश यांनी क्यूबन पार्क पोलिस स्टेशनमध्ये क्रिकेटपटू विराट कोहलीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले आहे की, या तक्रारीचा विचार आधीच नोंदवलेल्या गुन्ह्याखाली केला जाईल आणि चेंगराचेंगरीच्या घटनेच्या चालू तपासादरम्यान त्याची चौकशी केली जाईल. विराट कोहली लंडनला जात असल्यामुळे, कोणत्याही व्यवस्थेशिवाय घाईघाईने हा विजयउत्सव आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये लोकांना आपला जीव गमवावा लागला, आरोप केला गेला आहे. Virat Kohli
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी आरसीबी, डीएनए एंटरटेनमेंट आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) विरुद्ध एफआयआर दाखल केला. त्यांच्यावर गुन्हेगारी निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्यवधाचा आरोप आहे, त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसाळे, डीएनए एंटरटेनमेंटचे सुनील मॅथ्यू, सुमंत आणि किरण कुमार यांना अटक केली आणि आज न्यायालयात हजर केले, त्यानंतर न्यायालयाने चौघांनाही कोठडी सुनावली आहे.
ही दुर्घटना ४ जून २०२५ रोजी घडली. जेव्हा आरसीबी संघ आयपीएल २०२५ चा विजय साजरा करत होता. पोलिसांनी विजय रॅली आणि उत्सव पुढे ढकलण्यास सांगितले होते, परंतु तरीही आरसीबीने ते आयोजित केले होते, त्यानंतर चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी जमली होती, त्यानंतर पोलिस त्यावर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, तर ५० हून अधिक लोक जखमी झाले, ज्यात मुलांचा समावेश आहे. चेंगराचेंगरीच्या घटनेबाबत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी बंगळुरूचे पोलिस आयुक्त बी. दयानंद आणि इतर ४ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App