निवडणूक न लढता दोघेजण खासदार झाले
विशेष प्रतिनिधी
गुवाहाटी : आसाममधील ( Assam ) सत्ताधारी पक्ष भाजपने राज्यसभेच्या दोन जागा जिंकल्या आहेत. निवडणूक न लढवता दोन जागा पक्षाला मिळाल्या आहेत. सोमवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती, त्यामुळे राज्यात होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे फक्त दोनच उमेदवार रिंगणात होते. त्यामुळे भाजपच्या त्या दोन्ही उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल केलेले भाजपचे दोन उमेदवार रामेश्वर तेली आणि मिशन रंजन दास यांना गुवाहाटीमध्ये रिटर्निंग ऑफिसर राजीव भट्टाचार्य यांनी त्यांचे प्रमाणपत्र दिले होते.भट्टाचार्य यांनी या प्रकरणी सांगितले की, अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ते दोनच उमेदवार होते, तेली आणि दास या दोघांनाही कोणतीही स्पर्धा न करता विजयी घोषित करण्यात आले आणि त्यांचे प्रमाणपत्र देण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री तेली आणि उत्तर करीमगंजचे चार वेळा आमदार राहिलेल्या दास यांनी २१ ऑगस्ट रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माजी केंद्रीय मंत्री तेली यांनीही पक्ष नेतृत्वाचे आभार मानले. ते म्हणाले, ‘मला संसदेत राहण्याचा आणि मंत्री म्हणूनही अनुभव आहे. दास हे विधानसभेचा मोठा अनुभव असलेले पक्षाचे ज्येष्ठ सदस्य आहेत. आम्हाला खात्री आहे की आम्ही राज्यसभेत संबंधित विषय मांडू शकू.
लोकसभा निवडणुकीत दिब्रुगडमधून माजी केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल आणि काझीरंगा मतदारसंघातून कामाख्या प्रसाद तासा यांच्या विजयानंतर भाजपकडे असलेल्या राज्यसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. तसेच, ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो. असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App