“वहिनी, I LOVE YOU!” भर सभेत महिला कार्यकर्त्यांची हाक; सुनेत्रा पवार हसल्या अन् म्हणाल्या, “I LOVE YOU TOO”

विशेष प्रतिनिधी

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यात ‘दादा उद्योगिनी’ अ‍ॅपचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भाषण करत असताना महिला कार्यकर्त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त घोषणेमुळे वातावरण भावनिक झाले. “वहिनी, I LOVE YOU,” अशी हाक महिला कार्यकर्त्यांनी दिल्यानंतर सुनेत्रा पवार हसल्या आणि त्यांनीही “I LOVE YOU TOO” असे म्हणत कार्यकर्त्यांना प्रतिसाद दिला.

कार्यक्रमादरम्यान सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यावेळी त्या भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या भावनिक भाषणामुळे उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही भावनाविवश वातावरण निर्माण झाले.

“रडायचं नाही, तर लढायचं बळ मिळतं”

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “माझ्या, तुमच्या आणि संबंध महाराष्ट्राच्या मनात जी पोकळी निर्माण झाली आहे, ती कोणीही कधीच भरून काढू शकत नाही. एका क्षणात आपण सर्वच पोरके झालो. पण जेव्हा मी तुमच्या डोळ्यांत पाहते, तेव्हा मला रडायचं नाही, तर लढायचं बळ मिळतं.”

त्यांचे हे शब्द ऐकताच महिला कार्यकर्त्यांनी “वहिनी, I LOVE YOU” अशी हाक दिली. त्यावर सुनेत्रा पवार काही क्षण हसल्या आणि म्हणाल्या, “I LOVE YOU TOO.” या प्रसंगामुळे कार्यक्रमातील वातावरण आणखी भावनिक झाले.

अजित पवार यांना अश्रू कधीच आवडत नसल्याचेही सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.

अजित पवारांनीही कार्यकर्त्यांना दिला होता मिश्किल सल्ला

दरम्यान, यापूर्वी एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी अजित पवार यांना “दादा, I LOVE YOU” असे म्हटले होते. त्यावेळी अजित पवार यांनी नेहमीच्या मिश्किल शैलीत प्रतिक्रिया दिली होती.

“आता मला घरी गेल्यावर बायको जोड्यानेच हाणेल. माझ्यावर एवढं प्रेम करण्याआधी तू तुझ्या बायकोवर कर आणि मग माझ्यावर कर,” असा मिश्किल सल्ला त्यांनी कार्यकर्त्याला दिला होता.

सुनेत्रा पवार आणि महिला कार्यकर्त्यांमधील या भावनिक संवादाचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“Vahini, I LOVE YOU!” Women Workers’ Emotional Shout : Sunetra pawar

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात