उशीर झाला, पण आता माफी नाही! तुकाराम मुंढेंचा थेट इशारा; कारवाई सुरूच राहणार

Tukaram Mundhe

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. एफडीएचा आरोप आहे की, ‘विमल वेलची’ या नावाने प्रसारित झालेली ही जाहिरात प्रत्यक्षात ‘विमल पान मसाला’ची अप्रत्यक्ष जाहिरात आहे, तर दुसरीकडे पान मसाला आणि गुटखा महाराष्ट्रात पूर्णपणे प्रतिबंधित उत्पादने आहेत. राज्यातील तंबाखू आणि निकोटीनयुक्त उत्पादनांविरोधातील व्यापक मोहिमेचा भाग म्हणून हे तीन मोठे अभिनेते एफडीएच्या कक्षेत आले आहेत. दरम्यान, अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उशीर झाला असला तरी योग्य ती कारवाई करू, असे स्पष्ट केले आहे. Tukaram Mundhe

माध्यमांशी संवाद साधताना तुकाराम मुंढे म्हणाले की, खूप उशीर झाला असं म्हणता येणार नाही. याआधीही आपण नोटीस देऊ शकलो असतो. कारण हा कायदा 2011 चा आहे आणि जाहिरातीच्या बाबतीत नियमन 2018 मध्ये आले आहे आणि त्याची अंमलबजावणी जुलै 2019 पासून सुरू झालेली आहे. त्या काळातही या जाहिराती होत्या, तर नक्कीच याप्रकरणात थोडा उशीर झाला आहे. परंतु, ठीक आहे उशीर झाला असला तरी या प्रकरणात आम्ही योग्य ती कारवाई करत आहोत, असे तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केले.



शाहरुख खान, अजय देवगण, आणि टायगर श्रॉफ यांना पाठवलेल्या नोटीसमध्ये काय? असा प्रश्न विचारला असता, तुकाराम मुंढे म्हणाले की, नोटीसमध्ये आम्ही म्हटलं आहे की, 10 लाखांपर्यंतचा दंड लागू शकतो. पण त्याचबरोबर महाराष्ट्र प्रोहिबिशन एक्ट माहे सेक्शन 13 अंतर्गत आहे. प्रोहिबिशन एक्टमध्ये जे नियम लागू आहेत, त्यानुसार आपल्याला कारवाई करता येईल. तसेच विमल पान मसाला अनसेफ पण आहे, हे सिद्ध झालेले आहे. त्यामुळे आपण प्रोहिबिशन केलेले आहे. अनसेफची सेक्शन 59 नुसार आपल्याला कारवाई करता येईल, अशी माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.

शाहरुख खान, अजय देवगण, आणि टायगर श्रॉफ यांना बजावण्यात आलेल्या या नोटिसांमध्ये विमल पान मसाला जाहिरातीमधील त्यांच्या भूमिका आणि दिसण्याबाबत उत्तरे मागवण्यात आली आहेत. एफडीएच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, ही जाहिरात ‘विमल पान मसाला’ या प्रतिबंधित ब्रँडशी थेट जोडलेली आहे आणि त्याच उत्पादनाचा अप्रत्यक्षपणे प्रचार करत आहे. एफडीएने नोटीसमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, जाहिरातीचे बारकाईने परीक्षण केल्यास असे दिसून येते की, ती प्रथमदर्शनी ‘विमल’ ब्रँडचा प्रचार करत आहे, ज्याची मुख्य ओळख पान मसाला आहे.

राज्य अन्न सुरक्षा आयुक्तांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 च्या कलम 30 (2) (अ) अंतर्गत, महाराष्ट्रात अशा उत्पादनांचे उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री यावर 13 जुलै, 2026 पासून एक वर्षाच्या कालावधीसाठी संपूर्ण बंदी घातली आहे. प्रशासनाचा असा विश्वास आहे की, जाहिरातीची शैली, संवाद, ब्रँडचे नाव आणि बाजारातील परिस्थिती यावरून, हे तीन अभिनेते ब्रँड एंडोर्सर म्हणून दिसत असून, प्रतिबंधित तंबाखू उत्पादनाचा हा छुपा प्रचार आहे का? याबद्दल गंभीर प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे एफडीएने अन्न सुरक्षा आणि मानक कायदा, 2006 च्या कलम 24 चा वापर केला आहे, जे दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंधित करते. तसेच, कलम 53 अंतर्गत कारवाई करण्याचे आवाहन केले आहे, ज्यानुसार दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींशी संबंधित असलेल्या किंवा त्या प्रकाशित करणाऱ्या कोणत्याही पक्षाला 10 लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. अन्न सुरक्षा नियम 2018 चा हवाला देत, या नोटीसमध्ये तीन कलाकारांना त्यांची बाजू लवकरात लवकर मांडण्यास सांगितले आहे.

Action Delayed, But It Won’t Stop: Tukaram Mundhe Warns

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात