Eknath shinde : शिवाजी महाराज पुतळा कोसळल्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी नेमक्या कारणांचा खुलासा!!

Eknath shinde

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Eknath shinde  : मालवणमध्ये राजकोट किल्ल्याच्या परिसरात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा 35 फुटी पुतळा कोसळला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 4 डिसेंबर 2023 ला नौदल दिनाच्या निमित्ताने शिवरायांच्या या भव्य पुतळ्याचे अनावरण केले होते. पण हा पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये कोसळला. त्यामुळे शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नेमक्या कारणांचा खुलासा केला. Eknath shinde say about shivaji maharaj statue

एकनाथ शिंदे म्हणाले :

झालेली घटना ही दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. हा पुतळा नौदलाने उभारला होता. त्याचे कम्पलिट डिझाईन नौदलानेच तयार केले होते. मी कलेक्टरशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की, ताशी 45 किलोमीटर वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळा कोसळला. उद्या तिथे नौदलाचे अधिकारी येणार आहेत. आमचे पालकमंत्री रवींद्र चव्हाणही घटनास्थळी गेले आहेत. मी त्यांना सूचना केलेल्या आहेत. उद्या तात्काळ नौदलाचे अधिकारी आणि आमचे अधिकारी हे छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्याचे काम पुन्हा सुरू करतील.


Vasant Chavan : काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे दुःखद निधन; हैदराबादेतील रुग्णालयात सुरू होते उपचार


आमदार वैभव नाईक यांनी या घटनेनंतर मालवणमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. याबाबत एकनाथ शिंदे यांनी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ठीक आहे. शेवटी भावना आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत. पण कायदा हातात घ्यायची आवश्यकता नाही. कायदा-सुव्यवस्था राखण्याचं काम प्रत्येकाने केलं पाहिजे. कायदा हातात घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राहिली पाहीजे यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया

छत्रपती घराण्याचे कोल्हापूर गादीचे वंशज तथा माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली. “पंतप्रधानांनी उद्घाटन करण्यासाठी घाई गडबडीत उभारलेला पुतळा कोसळला! मुळातच आकारहीन आणि शिल्पशास्त्रास अनुसरून नसलेला, घाईगडबडीत उभारलेला हा पुतळा बदलावा म्हणून तेव्हाच आम्ही पंतप्रधानांकडे पत्र लिहून मागणी केली होती. या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक वर्षभरात कोसळते यासारखी दुर्दैवी बाब कोणती नाही. अशा परिस्थितीत महाराजांच्या किल्ल्यांवर आपण कोणत्या अधिकाराने बोलणार? आता त्याठिकाणी पुन:श्च महाराजांचे उचित स्मारक उभारणे गरजेचेच आहे. पण निवडणुकीच्या आधी ते उभारण्याच्या इर्ष्येत परत काही गडबड करू नये. उशीर होऊदे पण शास्त्रोक्त पद्धतीने या स्मारकाची पुनर्बांधणी झाली पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले.

Eknath shinde say about shivaji maharaj statue

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात