Omar Abdullah : काँग्रेसचा हिंदू विरोधाचा बुरखा फाटला; शंकराचार्य पर्वताचे नामांतर तख्त ए सुलेमान करण्यास काँग्रेसचा आक्षेप नाही!!

Omar Abdullah

  • ओमर अब्दुल्लांची माहिती

वृत्तसंस्था

श्रीनगर : जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सशी आघाडी केली. त्यासाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे अब्दुल्ला कुटुंबियांच्या घरी आले होते. पण त्यावेळी आघाडीचे जागावाटप त्यांनी केले नव्हते. ते जागावाटप आज केले. पण काँग्रेसने नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यावर आक्षेप घेतला नाही. ही माहिती खुद्द माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला Omar Abdullah यांनी दिली.

नॅशनल कॉन्फरन्सने आपल्या जाहीरनाम्यात श्रीनगर मधील ऐतिहासिक शंकराचार्य पर्वताचे नामांतर तख्त ए सुलेमान करण्याचे वचन दिले. त्यावरून जम्मू-काश्मीरच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये मोठा गदारोळ उठला. नॅशनल कॉन्फरन्स महिन्यामध्ये अनेक फुटीरतावादी आश्वासन केली. रोशनी कायदा परत आणण्याची बात केली. ही आश्वासने काँग्रेसला मान्य आहेत का??, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी केला. मात्र काँग्रेसने या सवालांना कुठलीच उत्तरे देण्याचे टाळले.

यातला शंकराचार्य पर्वताच्या नामांतराचा मुद्दा अतिशय गंभीर ठरला आहे. खुद्द आद्य शंकराचार्यांनी ज्या पर्वतावर तपश्चर्या केली, असा तो पर्वत आहे आणि त्याचे नामांतर तख्त ए सुलेमान या नावाने करण्याचा घाट अब्दुल्ला परिवाराच्या नॅशनल कॉन्फरन्सने घातला आहे. एक राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसने त्यावर आक्षेप घ्यायला हवा होता. परंतु त्या पक्षाने तसा आक्षेप घेतला नसल्याचे समोर आले आहे.

नॅशनल कॉन्फरन्सच्या जाहीरनाम्यावर काँग्रेसने कुठलाच आक्षेप घेतला नाही. आम्ही त्यांना किंवा त्यांनी आम्हाला जाहीरनाम्याबद्दल काही विचारले नाही, अशी माहिती ओमर अब्दुल्ला यांनी दिली. त्यामुळे काँग्रेसच्या हिंदू विरोधाचा बुरखा परस्पर फाटला. Omar Abdullah

एवढे होऊनही काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स यांच्यातील आघाडी पूर्ण होऊ शकलीच नाही. काँग्रेस 32, तर नॅशनल कॉन्फरन्स 51 जागा लढणार आहे. 5 जागांवर मतभेद झाल्याने तिथे दोन्ही पक्ष उमेदवार उभे करणार आहेत.

 Omar Abdullah no point in time did the Congress party raise any objections to our manifesto

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात