…म्हणून दिल्ली पोलीस विभव कुमारला मुंबईला घेऊन जाणार!

दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला १९ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत गैरवर्तन आणि मारहाण केल्याप्रकरणी दिल्ली पोलीस आरोपी विभव कुमारला मुंबईत घेऊन जाण्याची चिन्ह आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ज्या फोनमध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करण्यात आला होता तो मुंबईतच फॉरमॅट करण्यात आला होता. याचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलीस मालिवाल यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपी विभव कुमारला मुंबईत घेऊन जाऊ शकतात. पोलिसांनी विभला घेऊन सिव्हिल लाइन पोलिस स्टेशन सोडले आहे आणि आज दुपारी विमानाने ते मुंबईला घेऊन जाऊ शकतात.Delhi Police will take Vibhav Kumar to Mumbai



दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला १९ मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून अटक केली होती. 13 मे रोजी स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर सहा दिवसांतच विभवचे वेगवेगळ्या राज्यात लोकेशन सापडले. पंजाब, मुंबई आणि लखनऊ ही त्याची ठिकाणे होती. लखनऊमध्ये अरविंद केजरीवाल यांच्यासोबत विभव कुमारही दिसला होता.

आम आदमी पार्टी स्वाती मालीवाल यांच्यावर सतत टीका करत आहे. स्वाती मालीवाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे प्रकरण असल्याने भाजपच्या इशाऱ्यावर हे सर्व करत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. आम आदमी पक्षाच्या या आरोपावर स्वाती मालीवाल यांनीही प्रत्युत्तर दिले होते.

Delhi Police will take Vibhav Kumar to Mumbai

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात