अयोध्येत रामजन्मभूमी मंदिरात प्राणप्रतिष्ठा; 100 कोटी हिंदूंचे स्वप्न साकार!!; देश कल्याणार्थ मोदींचा श्रीरामांना साष्टांग नमस्कार!!

विशेष प्रतिनिधी

अयोध्या : आयोध्येत श्री राम जन्मभूमी मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अभिजीत मुहूर्तावर श्री रामल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि 100 कोटी हिंदूंचे स्वप्न सत्यात उतरले. साडेपाचशे वर्षांचा कडवा संघर्ष खऱ्या अर्थाने कामी आला. शेकडो कार्य सेवकांच्या हौतात्म्याचे चीज झाले. लाखो कारसेवकांचे कष्ट फळाला आले.Pranapratistha at Ramjanmabhoomi temple in Ayodhya; A dream of 100 crore Hindus come true!!; Modi’s prostration to Shri Ram for the welfare of the country!!



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अभिजीत मुहूर्तावर श्री रामल्लांचे वैदिक मंत्रोच्चारात प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी गर्भगृहात सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राज्यपाल आनंदीबेन पटेल यांच्यासह 11 यजमान दांपत्ये उपस्थित होते.

ज्यावेळी 12 वाजून 21 मिनिटांनी श्रीराम लल्लांची प्राणप्रतिष्ठा झाली, त्याचवेळी देशभरातल्या आणि परदेशातल्या मंदिरांमध्ये पूजन झाले. कोट्यवधी हिंदूंनी आपापल्या परिसरातील मंदिरांमध्ये मोठमोठे स्क्रीन लावून रामाचा उत्सव पाहिला. श्रीरामांची पूजन आणि आरती झाल्यानंतर देश कल्याणार्थ मोदींनी श्रीरामांना साष्टांग नमस्कार घालून प्रार्थना केली.

Pranapratistha at Ramjanmabhoomi temple in Ayodhya; A dream of 100 crore Hindus come true!!; Modi’s prostration to Shri Ram for the welfare of the country!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात