आता उत्तर प्रदेशला मिळणार समृद्धीचे पंख, दरवर्षी महसुलात किमान 25 हजार कोटींची वाढ होणार

राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली :राम मंदिर प्राणप्रतिष्ठा : अयोध्येतील वर्षानुवर्षांची प्रतीक्षा आज संपली आहे. मोदींच्या उपस्थितीत राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. पण तुम्हाला माहित आहे का की राम मंदिराच्या अभिषेकनंतर उत्तर प्रदेशच्या महसुलालाही समृद्धीचे पंख मिळणार आहेत.Now Uttar Pradesh revenue will increase by at least 25 thousand crores every year



उत्तर प्रदेशच्या महसुलात दरवर्षी किमान 20 ते 25 हजार कोटी रुपयांची वाढ होईल, अशी अपेक्षा आहे. राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. एका अहवालानुसार, दरवर्षी 5 कोटी पर्यटक तेथे येण्याची अपेक्षा आहे. कोणकोणत्या क्षेत्रांतून अधिक महसूल मिळेल ते जाणून घेऊया.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशातील पर्यटकांकडून केला जाणारा खर्च 2022च्या तुलनेत दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 2022 मध्ये देशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशमध्ये 2.2 लाख कोटी रुपये खर्च केले. त्यात यंदा दुपटीने वाढ करण्याची तयारी सुरू आहे.

विदेशी पर्यटकांनी राज्यात 10 हजार कोटी रुपये खर्च केले होते. ज्या क्षेत्रांकडून लोकांना अपेक्षा आहेत. त्यामध्ये पर्यटन, हॉटेल्स, पूजा साहित्य इत्यादी प्रथम येतात. त्यामुळे दरवर्षी केवळ व्यापाऱ्यांनाच फायदा होणार नाही, तर सरकारच्या महसुलातही वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Now Uttar Pradesh revenue will increase by at least 25 thousand crores every year

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात