पश्चिम महाराष्ट्रातला “राम संपर्काचा” आकडा खरे तर पवार गटाला धडकी भरवणारा, पण तो गट नुसताच वाजवतोय तोंडाचा बेंडबाजा!!, हे शीर्षक सहज सुचले म्हणून दिलेले नाही किंवा पवार गटाला नुसते डिवचण्यासाठी देखील दिलेले नाही, तर त्या शीर्षकात खरंच खूप मोठा राजकीय आशय भरला आहे, जो शरद पवारांच्या तथाकथित पश्चिम महाराष्ट्रातल्या बालेकिल्ल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. The figure of Ram Samparka in western Maharashtra is actually a shock to the Pawar group
“पश्चिम महाराष्ट्र म्हणजे शरद पवारांचा बालेकिल्ला”, हे समीकरण आमच्या समर्थकांनी आणि माध्यमाने वर्षानुवर्षे लावून धरले. अनेक पवार विरोधकांनी या बालेकिल्ल्यात सेंधमारी करण्याचा प्रयत्न केला. त्यात ते कधी यशस्वी झाले, पण अनेकदा यशस्वी झाले. कारण पवारांची या बालेकिल्ल्यावरची विशिष्ट राजकीय पकड खऱ्या अर्थाने विरोधक कधीच ढिल्ली करू शकले नव्हते. त्यात पवारांच्या स्वतःच्या राजनैतिक कौशल्याचा फार मोठा भाग होताच, पण त्याहीपेक्षा तो “मीडिया मॅनेजमेंट” मधून पवार फार मोठे नेते आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या राजकारणात त्यांच्या शिवाय पान हलत नाही, असे मीडिया पर्सेप्शन तयार करण्यातून तो पवारांचा बालेकिल्ला ठरवला गेला होता.
प्रत्यक्षात विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलेली पश्चिम महाराष्ट्रातील “राम संपर्काची” आकडेवारी पाहिली, तर पवारांनी आपल्या राजकीय कारकिर्दीच्या सर्वोच्च बिंदूवर देखील पश्चिम महाराष्ट्रात एवढा मोठ्या प्रमाणावर जनसंपर्क केला असण्याची बिलकुलच शक्यता दिसत नाही. एरवी पवार खूप चाणाक्ष नेते आहेत, ते सतत माणसांमध्ये वावरत असतात भेटलेल्या प्रत्येक माणसाला ते ओळखतात वगैरे पर्सेप्शन पवारभक्तांनी तयार केले आहे. ते काही अंशी खरे देखील आहे, पण ज्या पद्धतीची “राम संपर्क” यंत्रणा विश्व हिंदू परिषदेने राम जन्मभूमी मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने राबवली, त्याची नेमकी आकडेवारी बघितली तर पवारांचा तथाकथित लोकसंपर्क एवढ्या मोठ्या प्रमाणावर कधी होता का??, हा कळीचा सवाल आहे आणि त्याचे उत्तर प्रामाणिकपणे द्यायचे झाले, तर ते होकारात्मक देता येणे कठीण आहे.
पवारांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांच्या वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी पश्चिम महाराष्ट्र मधल्या 7 जिल्ह्यांमध्ये 50 लाखांपेक्षा अधिक कुटुंबांशी संपर्क साधल्याचा इतिहास आहे का?? 50 लाख पेक्षा जास्त कुटुंबे म्हणजे किमान 2 कोटी लोक. एवढ्या लोकांपर्यंत पवार आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या विविध पक्षांचा कधी थेट संपर्क झाला होता का??, हे पवारांच्या पक्षाला मिळालेल्या सर्वोच्च मतांच्या आधारे देखील सिद्ध करता येऊ शकते. कारण पवारांना मिळालेली मते पवार आणि त्यांच्या संलग्न पक्षांना मिळालेली मते 1 कोटीच्याच आत आहेत. (2019 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत 92 लाख 16 हजार 919 मते मिळाली होती. ही अखंड राष्ट्रवादी काँग्रेस असतानाची मते आहेत, फूट पडल्यानंतरची नव्हेत.) त्यामुळे त्यांचा जनसंपर्क 2 कोटी माणसांपर्यंत झाला असेल का??, हा प्रश्नच आहे.
या अर्थाने फक्त पश्चिम महाराष्ट्रामधल्या 7 जिल्ह्यांची विश्व हिंदू परिषदेने जाहीर केलेल्या “राम संपर्काच्या” विशेष आकड्याला महत्त्व आहे. कारण रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेची अक्षत विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांमध्ये 50 लाख कुटुंबांपेक्षा जास्त कुटुंबांना दिली आणि 51 लाखांपेक्षा जास्त घरांमध्ये प्रत्यक्ष संपर्क साधला. हा आकडा निश्चितच डोळे विस्फारणारा आहे.
या आकड्यावर खरं म्हणजे पवार आणि त्यांच्या समर्थकांनी बोलायला पाहिजे. त्यातून खरा गंभीर राजकीय धडा शिकून आणि आपली पर्यायी रणनीती तयार केली पाहिजे. पण ते करताना पवार किंवा त्यांचा गट अजिबात दिसत नाहीत. उलट जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवारांची रोजची पत्रकार परिषद किंवा पवारांचा, जयंत पाटलांचा आणि सुप्रिया सुळे यांचा रोजचा कुठे ना कुठे दौरा आणि अजित पवार गटावर केलेली टीका याखेरीज पवार गटाच्या दुसऱ्या कुठल्याच बातम्या येत नाहीत. निवडणूक रणनीती आणि त्यातही एवढ्या मोठ्या प्रमाणावर संपर्क करून प्रत्यक्ष गाव, तालुका, जिल्हा पातळीवरचे नेटवर्क उभे करणे अशी कुठलीही गंभीर गोष्ट पवार गटाकडून घडताना दिसत नाही.
शरद पवार हे पश्चिम महाराष्ट्रातले खूप मोठे नेते आहेत, हे फक्त परसेप्शन आहे. त्यापलीकडे खरा जनसंपर्क हा राम संपर्काच्या निमित्ताने संघ परिवाराने पर्यायाने भाजपने करून घेतला आहे. त्यात इतर कोणत्याही पक्षांचा वाटा नाही, ही बाब राजकीय दृष्ट्या इतर पक्षांसाठी अत्यंत गंभीर आहे, जिचा भाजप पेक्षा त्याच्या मित्रपक्षांनी आणि त्याहीपेक्षा पश्चिम महाराष्ट्र हा आपला बालेकिल्ला आहे, अशी राजकीय आढ्यता मिळवणाऱ्या पवार गटाने विचार करण्याची खरी गरज आहे!!
पश्चिम महाराष्ट्रात 50 लाखांहून अधिक कुटुंबांना अयोध्येच्या सोहळ्याचे अक्षत वाटप!!
अयोध्येतील रामजन्मभूमीवरील मंदिरात श्री रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दिवस जवळ येत असतानाच त्या सोहळ्याचे निमंत्रण घरोघरी पोहोचले आहे. पश्चिम महाराष्ट्रात तब्बल 50 लाखांपेक्षा अधिक कुटूंबांना अक्षता वाटप करण्यात आले आहे. 1 ते 18 जानेवारी दरम्यान विश्व हिंदू परिषदेने हे अक्षता वाटप अभियान घेतले.
आकडे बोलतात
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, या 7 शासकीय जिल्हा क्षेत्रात 8 महापालिका क्षेत्रे, 94 तालुके, 6064 गावे, 10 हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या 1503 रहिवासी परिसर येथे घरोघरी संपर्क करून विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तब्बल 50 लाख 89 हजार 336 कुटुंबांना अक्षत दिली. त्यासाठी 51 लाख 14 हजार 607 घरांमध्ये संपर्क साधला.
या अक्षता वाटप उपक्रमात विश्व हिंदू परिषदेचे तब्बल 1 लाख 90 हजार 716 कार्यकर्ते सहभागी झाले. यामध्ये 1 लाख 51 हजार 101 पुरूष, तर 40 हजार 219 महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.
अशी आकडेवारी पवार आणि त्यांचे संलग्न पक्ष देऊ शकतील का??, हा गंभीर सवाल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more