वीज जोडणी मिळाल्यावर शेतकऱ्यांनी वापरलेल्या विजेच्या बिलाचे पैसे भरले नाहीत. Akola: Power cut hanging sword, arrears of Rs 2 crore 54 lakh, including 2943 farmers in the district
विशेष प्रतिनिधी
अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळात येणाऱ्या अकोला , बुलढाणा आणि वाशिम जिल्ह्यातील सुमारे ११ हजार शेतकऱ्यांनी मागील अनेक वर्षापासून वीज देयकाचे पैसे न भरल्याने ही कारवाई करावी लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.वीज जोडणी मिळाल्यावर शेतकऱ्यांनी वापरलेल्या विजेच्या बिलाचे पैसे भरले नाहीत.
दरम्यान यामध्ये अकोला जिल्ह्यातील २९४३ शेतकऱ्यांचा समावेश असून त्यांच्याकडे तब्बल दोन कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. अकोला जिल्ह्यात दहा अश्वशक्ती पेक्षा जास्त जोडभार मंजूर असलेल्या कृषी पंप धारकांच्या श्रेणीत १९६ शेतकऱ्यांकडे १ कोटी ६२ लाख रुपयांची थकबाकी आहे.
उच्चदाब वीज वितरण प्रणाली योजनेत शेतकऱ्यांना मार्च २०१८ नंतर वीज पुरवठा करण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात उच्च दाब वितरण प्रणाली योजनेत २७४७ शेतकऱ्यांकडे ९२ लाख रुपयांची थकबाकी शिल्लक आहे.या थकबाकीदार शेतकऱ्यांनी मागील अनेक वर्षापासून वीज देयकाचे पैसे न भरल्याने ही कारवाई करावी लागत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App