मुंबईच्या नाईट लाईफची जेवढी काळजी तेवढी महिलांच्या सुरक्षेची का नाही? चित्रा वाघ यांचा महाविकास आघाडीला सवाल


विशेष प्रतिनिधी

मुंबई : सुरक्षित शहर म्हणून ओळख असणारे मुंबई शहर जंगलराज बनत चालले आहे. मुंबईतील खड्ड्यांसारखी राज्याची कायदा सुव्यवस्था खड्ड्यात गेली असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केला आहे. महाआघाडी सरकारला जेवढी काळजी मुंबईच्या नाईट लाईफची आहे.Why is it that women’s safety is not as important as Mumbai’s nightlife? Chitra Wagh questions Mahavikas Aghadi

तेवढीच काळजी महिला आणि मुलींच्या सुरक्षेसाठी का नाही, असा सवालही त्यांनी केला.वाघ म्हणाल्या, मुंबईतील कुर्ल्यात एका युवतीवर निर्जनस्थळी बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. ज्यावेळी साकीनाका येथे घटना घडली होती, त्यावेळी मुंबई पोलिसांनी महिला सुरक्षेविषयी परिपत्रक काढले होते.



त्यात स्पष्ट म्हटले होते की, निर्जन स्थळाचा आढावा घेऊन बीटमार्शल करू, निर्जन ठिकाणी लाईटची व्यवस्था करण्यासाठी बीएमसीकडे पत्रव्यवहार करू. त्या परिपत्रकाचे पुढे काय झाले.
आतापर्यंत मुंबई पोलिसांनी जे परिपत्रक काढले, त्यानुसार काय काम केले,

हे एकदा मुंबईच्या पोलिस आयुक्तांनी लोकांना सांगणे गरजेचे असल्याची मागणी करून चित्रा वाघ म्हणाल्या, साकीनाक्याच्या घटनेनंतर मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबलेल्या नाहीत. सुरक्षित शहर म्हणून ओळख असणारे मुंबई शहर कुठेतरी जंगलराज बनत चालले आहे, मुंबईतील खड्ड्यांसारखी राज्याची कायदा सुव्यवस्था खड्ड्यात गेली असल्याचे त्यांनी सांगितले.

Why is it that women’s safety is not as important as Mumbai’s nightlife? Chitra Wagh questions Mahavikas Aghadi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात