युरियाची टंचाई संपणार, १६ लाख टन युरियाची आयात करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील शेतकऱ्यांना आता युरियाच्या टंचाईचा सामना करावा लागणार नाही. केंद्रीय खत मंत्रालयाने तब्बल 16 लाख टन युरियाची आयात करण्याचा निर्णय घेतला आहे.कृषी सेवा केंद्रांनी कृत्रिम टंचाई भासवून लूट सुरु केली होती त्याला आता आळा बसणार आहे.Central government decides to import 16 lakh tonnes of urea to end urea shortage

सध्या देशात रब्बी पिकांची पेरणी सुरू आहे. मात्र, खताची कमतरता असल्याची तक्रार विविध राज्यांतील शेतकरी करत आहेत. यामुळे केंद्र सरकारने खते आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पश्चिम किनारपट्टीवरील बंदरात 10 लाख टन आयात केलेले खत येईल तर 6 लाख टन पूर्व किनारपट्टीवर येईल. आयात केलेले खत देशात पोहोचून देशांतर्गत बाजारपेठेच्या पुरवठ्यासाठी इंडियन पोटॅश लिमिटेडला देण्यात येणार आहे.भारतात दरवर्षी 25 लाख टन युरियाचे उत्पादन होते, परंतु देशांतर्गत युरियाची मागणी उत्पादनापेक्षा जास्त आहे. त्याची पूर्तता करण्यासाठी दरवर्षी 80 ते 90 लाख टन युरिया आयात करावा लागतो. सरकार वेळोवेळी गरज, मागणी, पुरवठा आणि किंमतींचे मूल्यांकन करून युरिया आयात करण्यास परवानगी देते.

यावर्षी एप्रिल-जुलै या तीन महिन्याच्या कालावधीत चीनकडून सुमारे 10 लाख टन युरिया आयात करण्यात आला होता. देशांतर्गत गरजा लक्षात घेऊन चीनने आता नियार्तीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता भारताला रशिया आणि इजिप्तमधून युरिया आयात करावा लागत आहे.

देशातील एकूण खतांच्या वापरापैकी 55 टक्के युरिया आहे. इतर खतांच्या किंमती ह्या अधिकच्या आहेत शिवाय त्यामुळे पिकांची वाढ होत नाही या कारणामुळे शेतकरी युरिया वापरणेच पसंत करतात. युरियाच्या 45 किलोच्या बॅगची कमाल किरकोळ बाजारात 242 असून 50 किलो बॅगची किंमत 268 रुपये आहे तर डीएपीच्या 50 किलो बॅगची किंमत 1200 रुपये आहे.

खत मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार एप्रिल-सप्टेंबर दरम्यान खरीप पेरणी हंगामासाठी युरियाची आवश्यकता 17 लाख 75 हजार टन एवढी होती तर उपलब्धता 20 लाख 82 हजार टन आणि 16 लाख 56 हजार टन होती. सध्याच्या रब्बी पेरणी हंगामाची मागणी अंदाजे 17 लाख 9 हजार टन आहे,

तर २४ नोव्हेंबर रोजी उपलब्धता 5 लाख 44 हजार टन एवढी होती. याच रब्बी हंगामात 1 आॅक्टोबरपासून 4 लाख 41 हजार टन युरियाची विक्री झाली आहे. अशा परिस्थितीत आता या हंगामासाठी शेतकऱ्यांना केवळ 80 लाख टन युरिया उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Central government decides to import 16 lakh tonnes of urea to end urea shortage

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था