राजकीय पंगा संसदेच्या अंगणात; काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना “तृणमूळी” खोडा; ममतांचे ऐक्य प्रयत्न स्वत;च्या अटी शर्तींवर!!


भाजपवर तोंडी फैरी झाडत प्रत्यक्षात काँग्रेस फोडण्याची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची खेळी ताडल्यावर सावध झालेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी स्वत:च विरोधकांचे ऐक्य साधण्याचे जे काही प्रयत्न सुरू केले आहेत त्यांनाच खोडा घालायला तृणमूळ काँग्रेसचे नेते पुढे सरसावले आहेत.Political turmoil in the courtyard of; Thwart Congress’ unity efforts; Mamata’s unity efforts on its own terms

संसदेत सर्व विरोधकांनी समन्वय राखून केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करावा आणि त्यांचे नेतृत्व काँग्रेसने करावे असे मनसूबे रचणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या राजकीय इच्छेवर तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी अक्षरश: पाणी फेरले आहे. सर्व विरोधकांना एकत्र करण्याच्या काँग्रेसने बोलविलेल्या बैठकीस जायलाच तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांनी नकार दिला आहे.

नुसत्या नकारापर्यंत तृणमूळ काँग्रेसचे नेते मर्यादेत राहिले नाहीत तर त्यांनी, “आधी तुमचे घर सावरा, मग इतरांना एकत्र करा”, असा शहाजोग सल्ला देऊन काँग्रेस नेत्यांना डिवचले आहे. आणि इथेच तृणमूल काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या संघर्षाची नांदी आहे.



आत्तापर्यंत तृणमूळ काँग्रेस काँग्रेसला पश्चिम बंगालमधील गेल्या पंधरा वर्षात प्रत्येक लढाईमध्ये हरवत होती. शेवटच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या लढाईत तर तृणमूळ काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसला नामशेष करून टाकले. तब्बल 292 जागा असलेल्या पश्चिम बंगाल विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. पश्चिम बंगालमध्ये “काँग्रेस मुक्त राज्याची” मोहीम यशस्वी केल्यानंतर ममता बॅनर्जी आता पुढच्या राष्ट्रीय टप्प्यातल्या संघर्षाच्या दिशेने वळल्या आहेत.

त्यातला उपसंघर्ष म्हणजे भाजपवर तोंडी फैरी झाडून प्रत्यक्षात काँग्रेस फोडून आपली तृणमूल काँग्रेस बळकट करण्याचे त्यांचे डावपेच सुरू झालेच आहेत. त्यात खंड पडणार नाही. पण आता त्या पलिकडे जाऊन संसदेत देखील काँग्रेस पक्षाशी समन्वय न राखता त्या पक्षाचे मुख्य विरोधी पक्ष म्हणून असलेली राजकीय प्रतिष्ठा देखील घटविण्यासाठी ममता बॅनर्जी यांची पुढची पावले पडताना दिसत आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी, “काँग्रेस हाच राष्ट्रीय पातळीवरील मुख्य विरोधी पक्ष आहे,” असे नुकतेच उच्चरवाने सांगितले होते.

त्यालाच आपल्या राजकीय कृतीतून खोडा घालण्याचे काम ममता बॅनर्जी करताना दिसत आहेत. त्यामुळेच संसदेतले त्यांचे खासदार काँग्रेस नेत्यांनी बोलाविलेल्या सर्व विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणार नाहीत. याचा अर्थ उघड आहे, ममता बॅनर्जी यांना स्वत:च्या अटी – शर्तींवर सर्व विरोधकांचे ऐक्य साधायचे आहे, काँग्रेसच्या अटी शर्तींवर नव्हे. किंबहुना काँग्रेस पक्ष भाजपशी राजकीय पंगा घेण्यासाठी कमी पडतो हेच त्यांना दाखवून द्यायचे आहे.

इथून पुढच्या टप्प्यात ममता बॅनर्जी या काँग्रेसच्या केंद्रीय पातळीवरच्या प्रत्येक राजकीय खेळीला प्रतिखेळी करत आपले डावपेच खेळतील किंवा खेळण्याच्याच भाषेत बोलायचे झाले तर काँग्रेसला “फाऊल” करताना दिसतील.

बाकीच्या काँग्रेसना “प्रेरणा”

इथे आणखी एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे तृणमूल काँग्रेसने आणि ममता बॅनर्जी यांनी आपली महत्त्वाकांक्षा उघडपणे जाहीर केली आहे. त्यांना तृणमूल काँग्रेस ़ परिवार वाढवायचा आहे. याचा अर्थ त्यांना मूळ काँग्रेस पेक्षा आपला पक्ष मोठा करायचा आहे. पण काँग्रेस हे नाव धारण केलेला तृणमूळ काँग्रेस हा एकमेव पक्ष नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस, वायएसआर काँग्रेस आणि नुकताच स्थापन झालेला कॅप्टन अमरिंदरसिंग यांचा पंजाब लोक काँग्रेस हे तीनही पक्ष काँग्रेसच्या महावृक्षाच्या छायेखालून बाहेर आले आहेत आणि आता ते स्वतःचा वृक्ष मोठा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

ऐक्य प्रयत्नांना सुरूंग

ममता बॅनर्जी आपल्या राजकीय बंडखोरीच्या खेळीतून या सर्व काँग्रेस पक्षांना देखील उचकवताना दिसणार आहेत. ममता बॅनर्जी यांच्या राजकीय प्रेरणेतून बाकीच्या काँग्रेस पक्षांचे नेते देखील काँग्रेसच्या तथाकथित ऐक्‍य प्रयत्नांना खोडा घालू शकतात. काँग्रेसने सर्व विरोधकांची बोलावलेली बैठक सोमवारी 29 नोव्हेंबर रोजी आहे.

त्या दिवशीपर्यंत कदाचित बऱ्याच घडामोडी घडतील आणि काँग्रेसच्या ऐक्य प्रयत्नांना सुरुवात होण्यापूर्वीच सुरुंग लागेल, अशी स्थिती आहे. किंबहुना ममता बॅनर्जी यांच्या तृणमूळ काँग्रेसच्या नेत्यांचा तोच प्रयत्न दिसतो आहे…!!

Political turmoil in the courtyard of Parliament; Thwart Congress’ unity efforts; Mamata’s unity efforts on its own terms

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात